शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

करटेल गावात भातशेतीचे नुकसान

By admin | Updated: November 9, 2014 23:34 IST

जंगलातून रानटी डुकरांनी दररोज रात्री भातशेतीत घुसून नासधूस

कुंभाड : खेड तालुक्यातील आदर्श गाव करटेलमधील भातशेती रानटी डुकरांनी नष्ट केली आहे. करटेल गावापासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या येथील जंगलातून दररोज रात्री भातशेतीत घुसून मोठ्या प्रमाणात नासधूस करीत आहेत़ यामुळे गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़ या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे़खेड शहरापासून ५ किलोमीटर अंंतरावर असलेल्या गावातील श्रीकांत तुकाराम चव्हाण यांची दोन एकरातील भातशेती हातातोंडाशी आली होती. मात्र, ही भातशेती पेंढ्यासह या डुकरांनी नष्ट केली आहे़ या शेतीचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे़ डुकरांनी भात तर शिल्लक ठेवले नाहीच, तर भाताचा पेंढादेखील खाऊन फस्त करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. गेले दोन महिने येथील रानातील ही डुकरे दररोज गावातील या भातशेतीमध्ये येत आहेत. गावठी बियाण्यांपासून पाच प्रकारच्या भातबियाण्यांचा या भातशेतीमध्ये यावर्षी प्रयोग करण्यात आले होता. गावातील अन्य शेतकऱ्यांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ परतीच्या पावसाने या भातपिकाचे काहीअंशी नुकसान केले होते़ सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाल्याने उभी भातशेती आडवी झाली होती. त्यातच पाऊस झाल्याने भातपीक रूजले होते़ शेतीतील भाताचे पीक हातामध्ये येण्याची शक्यता कमी होती. गतवर्षीच्या तुलनेत ही भातशेती नगण्य असल्याने अगोदरच शेतकऱ्यांचे मनोबल कमकुवत झाले होते. अशातच रात्रीच्या सुमारास या जंगलातून डुकरांनी आपली हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे़ गेल्या दोन महिन्यांपासून हे डुक्कर या भातशेतीत घुसून दररोज नासधूस करीत आहेत़ यामुळे गावातील २० शेतकरी हताश झाले आहेत. याबाबत येथील वन अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील शेतकरी करीत आहेत. अखेर नाईलाज झाल्यानंतर शेतकऱ्यांनी येथील कृषी अधिकाऱ्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली आहे़ त्यांनी पंचनामा करून नुकसानाची माहिती घेतली. या नुकसानभरपाईचे आश्वासन दिले आहे. लाखो रूपयांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)