शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याकडे लक्ष द्या

By admin | Updated: November 3, 2014 23:25 IST

सुचिता वजराठकर : भातकापणीबाबत शेतकऱ्यांना आवाहन

वेंगुर्ले : परतीचा पाऊस व वातावरणातील बदलामुळे साथ रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन येथील पंचायत समिती सभापती सुचिता वजराठकर यांनी केले आहे. तालुक्यातील चारही आरोग्य केंद्रांमध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असल्याचीमाहिती यावेळी त्यांनी दिली. साथ रोगांवर योग्य ती उपाययोजना आरोग्य विभागाकडून घेण्यात येत असून सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयात उपस्थित राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. अवेळी पडणारा पाऊस, तसेच सततच्या वातावरणातील बदलांमधून डेंग्यू अथवा लेप्टो स्पायरेसिससारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ढगाळ वातावरण, तसेच कमीअधिक थंडी यामुळे आजारास मोठ्या प्रमाणात निमंत्रण मिळते. याच दरम्यान जिल्ह्यात भातकापणीचा हंगाम सुरू होतो. आरोग्य विभागाबरोबरच जनतेनेही सतर्क राहून साथींच्या रोगांपासून दूर राहण्याबाबत उपायोजना करणे आवश्यक आहे. केवळ शासनावर अवलंबून राहून चालणार नाही. त्यासाठी स्वत: अलर्ट रहा असे आवाहन सुचिता वजराठकर यांनी केले. (प्रतिनिधी)हयगय झाल्यास संपर्क साधा तापसरीसारख्या साथ रोगांवर उपाययोजना करण्यात वेंगुर्ले तालुका पूर्ण सक्षम असून आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी जनजागृती तसेच गृहभेट घेण्यात मग्न आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याच्या सक्त सूचनाही देण्यात आल्या आहेत. तापाच्या रुग्णांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करून घ्यावेत. उपचाराच्या दरम्यान कर्मचाऱ्यांकडून हयगय झाल्यास रुग्णांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वजराठकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले.