sindhudurg: पावशी ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला; सर्व्हिस रस्ता, बस शेडसाठी छेडले जन आंदोलन

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 9, 2023 12:02 IST2023-05-09T12:01:42+5:302023-05-09T12:02:27+5:30

'जोपर्यंत अधिकारी या रस्त्यावर येत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही'

Pawshi villagers block Mumbai-Goa highway; Public agitation sparked for service road, bus shed | sindhudurg: पावशी ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला; सर्व्हिस रस्ता, बस शेडसाठी छेडले जन आंदोलन

sindhudurg: पावशी ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला; सर्व्हिस रस्ता, बस शेडसाठी छेडले जन आंदोलन

सिंधुदुर्ग : आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशी घोषणा देत पावशी ग्रामस्थांनी मुंबई- गोवा महामार्ग रोखला. संबंधित अधिकारी वेळेत हजर न राहिल्याने पोलिस प्रशासनाला सुद्धा ताटकळत राहावे लागले आहे.

जोपर्यंत अधिकारी या रस्त्यावर येत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा पावशी ग्रामस्थांनी घेतला आहे. पावशी येथील सर्विस रस्ता व बस शेड बांधकामास मंजुरी मिळण्याकरिता हे जनआंदोलन छेडण्यात आले आहे. 

मुंबई गोवा महामार्गावर पोलिस प्रशासन सज्ज झाले असून आंदोलकांना बाजूला करण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु जोपर्यंत अधिकारी तिथे येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन छेडणार नाही असा इशारा येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

Web Title: Pawshi villagers block Mumbai-Goa highway; Public agitation sparked for service road, bus shed