शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पंचम खेमराज!

By admin | Updated: November 28, 2014 23:56 IST

मालवणी तडका

सकलो : पंचम खेमराज! तुमची आमची सगळ्यांचीच शान म्हंजेच पंचम खेमराज.
तुकलो : शिवराम राजे भोसले यांनी युवा पिढी सुशिक्षित होवक व्हयी म्हनान त्या काळात म्हंजे पन्नास वर्सांपूर्वी या संस्थेची स्थापना केली. ती धंदो म्हनान न्हय, तर आपल्या परिसरातील युवा पिढी शिकाक व्हयी म्हनान.
सकलो : आनी आता बातमी वाचून खूप वायट वाटला.
तुकलो : जो जो त्या महाविद्यालयातील शिकलो, तेका या वादाची बातमी वाचून खूप वायट वाटला.
सकलो : शिवराम राजेंका पन कधी वाटला नसला की, ह्या थरात ह्यो असो प्रसंग येयत म्हनान.
तुकलो : सावंतवाडी ही सुसंस्कृतांची आनी विचारवंतांची, समजूतदारांची म्हनान मानली जाता. त्या मानन्याक कोनी पन तडो जावक देव नुको. तसो कोन प्रयत्न करीत तर पाटेश्वराची आनी उपरलकराची काठी तेच्या पाठीर बसतली.
सकलो : अगदी खरा. शिक्षन संस्था म्हंजे धंदो ह्या आता सुरू झाला. पन त्या काळात...
तुकलो : पन त्या काळात शिवराम राजेंनी धंदो बघूक नाय व्हतो. तशी तेंका गरज पन नाय व्हती. शेवटी राजा मानूस तो.
सकलो : आपली येनारी पिढी शिकान मोठी व्होवची म्हनान तेनी सगळा केला, पन तिच पिढी इतकी मोठी झाली की, ती संस्था माझी की तुझी, ह्या वादात अडाकली.
तुकलो : घरगुती प्रश्न शक्य तितको चार भिंतीत सोडवललो बरो. तो ज्या येळाक चव्हाट्यावर येता, त्या येळाक घरातल्या प्रत्येक सदस्यान इचार करूक व्हयो.
सकलो : अगदी बरोबर. कोनतरी कायतरी सागता आनी आपून कायतरी चुकीचा करून घरान्याक चुकीच्या मार्गार न्हेव नये.
तुकलो : राजकारना आमीव बघली, अनुभवली. पन पंचम खेमराज ह्या महाविद्यालय सगळ्या युवा पिढीचा गोकूळ हा. थय नुको राजकारन.
सकलो : कोनतरी म्हनतलो, तुझो काय संबंध? तू गप रव. पन ये. यस. प्रियोळकरांनी आमका केमिस्ट्री शिकवली हा. त्या येळाक काय कळाक नाय...
तुकलो : पन आता केमिस्ट्री कळता. हेची केमिस्ट्री कशी जुळली, कशी जुळली आनी तेचा आऊटपूट काय, ह्या आता आमकाव कळाक लागला.
सकलो : खरा हा. त्या ग्राऊंडवर जे खेळाक तयार झाले, जिमखाना हॉलमध्ये रॅकेट फिरवनारे आता म्हातारे झाले आसतीत. तेंनी ही वादाची बातमी वाचली आसात, तर तेंका पन ते दिवस आठावतले.
तुकलो : आठवनी तर भरभरून हत. तुमच्यो, आमच्यो सगळ्यांच्यो. त्या महाविद्यालयात कित्येक जनांची नाळ जोडलली हा.
सकलो : ही नाळ प्रत्येकाची वलीच हा.
तुकलो : लायब्री आठवली आनी डोळ्यात पानी इला. खूप काय काय डोळ्यासमोरसून गेला. धमाल आठावली, मजा आठावली. आमच्या काळातले फिशपॉर्इंट आठावले. आनी ख्रराच डोळे पोनावले.
सकलो : तसो आमचो काय संबंध नाय, पन सहवासाचो संबंध खूप हा. ती शाळा भावीपिढी घडवनारा ता मंदिर हा. तेतूर नुको राजकारन.
तुकलो : घरगुती इषय. खूप नाजूक आसतत ते. हेतू शुध्द ठेवन चर्चेन सोडवा. आपल्या जिल्ह्याची शान ता कॉलेज हा. तेची नशा करू नुको, ही आमची इनंती हा.
सकलो : अगदी बरोबर. तुमका सगळ्यांका पाटेश्वर सुबुध्दी देवो आनी कसलाच राजकारन नाय व्हता. आमचा महाविद्यालय गोकूळ सारख्या नांदो.
तुकलो : ही सगळ्यांची इच्छा हा. सत्वशिलादेवी भोसलेंची स्तुती करनारी मंडळी व्यासपीठावर खूप येळा बघली. तीच मंडळी अशी कशी वागली, ह्योच प्रश्न हा.
सकलो : कोनचा बरोबर, कोनचा चूक ह्या आमका म्हायत नाय. ता त्या पाटेश्वराक म्हायती. ह्या गनित तेनाच सोडवक व्हया आनी आपल्या सुंदरवाडीची शान अबाधित ठेवची, हीच आमची इच्छा.
तुकलो : अगदी बरोबर. कोनी पन राजकारन मनात हाडू नये. तेच्यासाठी चार चार पावला पाठी या आनी पंचम खेमराज पाच मुठांची वज्रमूठ व्होवदे, अशी पाटेश्वराक प्रार्थना करू या.
- विजय पालकर