एक लाख ५३ हजारांची अवैध दारू पकडली, हुमरमळा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 15:56 IST2019-04-30T15:53:54+5:302019-04-30T15:56:45+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर पणदूरनजीक हुमरमळा येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सुमारे १ लाख ५३ हजारांची अवैध दारू पकडली. या कारवाईत कारसह एकूण ३ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एक लाख ५३ हजारांची अवैध दारू पकडली, हुमरमळा येथील घटना
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पणदूरनजीक हुमरमळा येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सुमारे १ लाख ५३ हजारांची अवैध दारू पकडली. या कारवाईत कारसह एकूण ३ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोवा ते कणकवली अशी गोवा बनावटीच्या अवैध दारुची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या आदेशावरून पेट्रोलिंग करीत असताना कुडाळहून कणकवली येथे जाणाऱ्या कारची तपासणी करण्यात आली.
या प्रकरणी कारचालकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणीस, सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष खांदारे, गुरुनाथ कोयंडे, पोलीस नाईक कृष्णा केसरकर, पोलीस हवालदार अमित तेली, जॅक्सन गोन्साल्विस यांच्या पथकाने ही कारवाई केली.
३ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त
हुमरमळा येथे केलेल्या कारवाईच्यावेळी दारु वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या कारमध्ये सुमारे १ लाख ५३ हजार रुपये किमतीची बेकायदेशीर दारू सापडली. या कारवाईत कारसह एकूण ३ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.