भरधाव कार झाडावर आदळून एक ठार, सहा जखमी; आंबोलीत झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 11:59 IST2024-01-04T11:59:07+5:302024-01-04T11:59:37+5:30
आंबोली ( सिंधुदुर्ग ) : सावंतवाडी तालुक्यातील आंबोली नांगरतास वाडी येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या जीपला भीषण अपघात झाल्याने एकाचा ...

भरधाव कार झाडावर आदळून एक ठार, सहा जखमी; आंबोलीत झाला अपघात
आंबोली (सिंधुदुर्ग) : सावंतवाडी तालुक्यातील आंबोली नांगरतास वाडी येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या जीपला भीषण अपघात झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. धाराशिव येथून पर्यटनासाठी गोव्याला जात असलेल्या थार जीप वरील ताबा सुटल्याने ती झाडावर आढळल्याने हा अपघात झाला. या अपघातात सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.
दत्तात्रय व्यंकट जाधव (वय २८, रा. धाराशिव) असे मृताचे नाव आहे, तर महादेव बांगर (३१), गणेश साळुंखे (२२) बालाजी बांगर (४०), सुनील भैया (३१) नवनाथ जाधव (३९) विष्णू बांगर, आदी गंभीर जखमी झाले.
हे सातहीजण आपल्या थार जीपने लातूरहून गोव्याच्या दिशेने चालले होते. यावेळी गाडीवरील नियंत्रण गेल्याने हा अपघात झाला. यात गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. तसेच गाडीच्या धडकेने झाडही उन्मळून पडले.