Sindhudurg: मुंबई-गोवा महामार्गांवर नडगिवे घाटात ट्रक अपघातात एक ठार
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 16, 2024 13:01 IST2024-10-16T13:00:44+5:302024-10-16T13:01:28+5:30
खारेपाटण : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या खारेपाटणनजीक नडगीवे बांबरवाडी घाटीत आज, बुधवारी सकाळी पहाटेच्यासुमारास गोव्यावरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या ...

Sindhudurg: मुंबई-गोवा महामार्गांवर नडगिवे घाटात ट्रक अपघातात एक ठार
खारेपाटण : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या खारेपाटणनजीक नडगीवे बांबरवाडी घाटीत आज, बुधवारी सकाळी पहाटेच्यासुमारास गोव्यावरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रक क्रमांक (जी जे ०१ जे टी ४६६९) चा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला.
याबाबत अधिक वृत्त असे की, नडगीवे बांबरवाडी घाटीत तीव्र वळणावर लोखंडी साहित्याने भरलेला ट्रेलर वरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रेलर दुभाजकवरून येत मुंबई ते गोवा जाणारा लेनवर येऊन पलटी होऊन अपघात झाला. अपघातामध्ये एकजण जखमी असून त्यास पुढील उपचार करता उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे पाठविण्यात आलेले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक -मुंडे, पोलिस नाईक -माने, खारेपाटण दूरक्षेत्रचे पोलिस अंमलदार -पराग मोहिते यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. जेसीबीच्या साहायाने ने साहित्य बाजूस करून मृत व्यक्तीची तपासणी केली. मृत हा मध्य प्रदेश येथील असल्याचे समजते आहे. अपघाताचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.