शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

पाठलाग करत पकडली दीड लाखांची दारू  : आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 11:32 AM

liquor ban Sindhudurg police- कणकवली मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली पोलिसांनी थरारक पाठलाग करत गोवा बनावटीची अवैध दारूची वाहतूक करणारा आरोपी सचिन प्रभाकर वेलीप (३०, केवना, शिवना दक्षिण गोवा) याला रंगेहाथ ताब्यात घेऊन अटक केली आहे. यात १ लाख ४२ हजार ८० रुपयांची अवैध दारू व कारसह तब्बल ४ लाख ४२ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पहाटे २ वाजण्याच्या सुमारास केली.

ठळक मुद्देपाठलाग करत पकडली दीड लाखांची दारू  : आरोपीस अटक  पहाटे २ वाजता केली पोलिसांनी कारवाई

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली पोलिसांनी थरारक पाठलाग करत गोवा बनावटीची अवैध दारूची वाहतूक करणारा आरोपी सचिन प्रभाकर वेलीप (३०, केवना, शिवना दक्षिण गोवा) याला रंगेहाथ ताब्यात घेऊन अटक केली आहे. यात १ लाख ४२ हजार ८० रुपयांची अवैध दारू व कारसह तब्बल ४ लाख ४२ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पहाटे २ वाजण्याच्या सुमारास केली.याबाबत अधिक माहिती अशी की, कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांना गोपनीय माहिती मिळाल्यानुसार, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई- गोवा महामार्गावर पोलीस पथक सापळा रचून थांबले होते. त्यावेळी कार क्रमांक (जी. ए. ०९ डी २०२०) ही गोव्याहून चिपळूणच्या दिशेने जात असताना दिसून आली. तिला थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र, आरोपीला पोलिसांचा सुगावा लागताच कार न थांबताच तळेरेच्या दिशेने वेगाने पळवली. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, वाहतूक पोलीस संदेश आबीटकर, रुपेश गुरव यांनी कारचा थरारक पाठलाग करून तळेरे एसटी स्टँड येथे ही कार पकडली. यावेळी कारची तपासणी केली असता कारमध्ये तब्बल १ लाख ४२ हजार ८० रुपयांच्या गोवा बनावटीच्या हनी गाईड ब्रॅण्डच्या १ हजार ७७६ बाटल्या बॉक्समध्ये भरलेल्या आढळून आल्या. त्याच्याबरोबरच सुमारे ३ लाख रुपये किमतीची कारही पोलिसांनी जप्त केली आहे.धडक कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुककणकवली पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूच्या विरोधात केलेल्या या धडक कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक केले जात आहे. याबाबत वाहतूक पोलीस संदेश आबीटकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी सचिन वेलीपविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्गExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग