शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे न झाल्याने भरपाई नाही ?

By admin | Updated: November 7, 2014 23:30 IST

खाडीपट्टा भागातील कर्जी, तळघर, अणस्पुरेतील शेतकऱ्यांनी मांडली

खाडीपट्टा : खेड तालुक्यातील भागातील बहुतांश भातशेतीवर करपा व कीडीचा प्रादुर्भाव होऊन भातपिकाचे नुकसान झाले आहे. त्यातच परतीच्या पावसामुळे भातशेती आडवी पडलेली असताना रानडुकरांनी त्याची नासाडी केली आहे. मात्र, रोगाने आणि करप्याने बाधित झालेल्या भातशेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे न झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर भरपाईपासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्रफळाचा आकडा वरिष्ठ कार्यालयाकडे तालुका कृषी कार्यालयाकडून पाठवला जातो. मात्र, ग्रामीण भागातील ज्यांचा उदरनिर्वाह केवळ शेतीवरच अवलंबून आहे, अशा गरीब शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. अद्याप ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांना कृषी कार्यालय, तलाठी अगर ग्रामपंचायतीकडे तक्रार करुन शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तक्रार कशी करावी, याची माहिती नसल्याने या बाधित क्षेत्राकडे कोणाचेही लक्ष नाही किंवा याची कोणत्याच यंत्रणेने दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पिकाची आशा सोडून केवळ जनावरांसाठी पेंढा मिळावा म्हणून त्या पिकाची कापणी केली असल्याची कैफियत खाडीपट्टा भागातील कर्जी, तळघर, अणस्पुरेतील शेतकऱ्यांनी मांडली. (वार्ताहर)आता भ्रांत वर्षभराची... एकीकडे कृषी विभागाने बऱ्याच ठिकाणी औषध फवारणीसाठी आवाहन केले आहे. मात्र, फवारणी न झाल्याने या भागात ही समस्या निर्माण झाली आहे. त्यातच याची नुकसान भरपाई शासनाकडून मिळण्याची आवश्यकता असल्याने वर्षभराच्या उदरनिर्वाहाची भ्रांत पडून राहिली आहे. याकडे तालुका कृषी कार्यालयाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.कृषी अधिकारी अद्याप नुकसानग्रस्त भागात फिरकलेले नाहीत. मात्र मंडळ अधिकारी यांनी मुंबके ग्रामपंचायतीच्या हद्दितील एका शेतकऱ्याच्या भातशेतीची पाहणी केली व नंतर परिसरातील भातशेतीची नुकसानीची पाहणी करुन पंचनामे करणार असल्याचे मंडळ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.- अकबर दुदुके - सरपंच, मुंबकेतालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी शेतीच्या नुकसानाची अद्याप कोणतीही पाहणी केलेली नाही किंवा महसूल खात्यानेही नुकसानाचे कोणतेही पंचनामे केलेले नाहीत. त्यामुळे भरपाई कशी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे. - मुश्ताक तांबे - सरपंच, कर्जी