जिल्हा परिषदेमध्ये हस्तक्षेप नाही : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 17:54 IST2021-04-07T17:50:16+5:302021-04-07T17:54:25+5:30
Uday Samant Zp Sindhudurgnews- मी कोणाच्याही कामात हस्तक्षेप करत नाही. जिल्हा परिषद कामांमध्ये मी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला नसल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी भवनात पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते उपस्थित होते.

जिल्हा परिषदेमध्ये हस्तक्षेप नाही : उदय सामंत
सिंधुदुर्ग : मी कोणाच्याही कामात हस्तक्षेप करत नाही. जिल्हा परिषद कामांमध्ये मी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला नसल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी भवनात पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, विरोधी पक्षांनी ८८ कामे पाठविली होती. त्यातील २९ कामे मंजूर केलेली आहेत. मात्र, यात नियोजन समितीमध्ये असलेल्या त्यांच्या सदस्यांनी सुचविलेली कामे नव्हती. त्यामुळे आपण केवळ ही यादी तपासली.
यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही विषय येत नाही, असे सांगतानाच जिल्हा परिषदेकडून आलेल्या पत्रामधील चरण वाघमारे प्रकरणाचा त्यांनी जो काय अर्धवट अभ्यास केला, तो आम्हांला माहिती आहे. त्यांना जे काही काही करायचे असेल ते करू द्या, मी नियमबाह्य कोणतेही काम करणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेमध्ये गट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेमध्ये तीन गट असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे, याबाबत पालकमंत्री सामंत यांना छेडले असता ते म्हणाले, आमच्या पक्षात कोणत्याही प्रकारचे गट नाहीत. उलट जिल्हा परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये गटबाजीचे राजकारण आहे. याचा प्रत्यय जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती निवडीत आला.