शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Anganewadi Jatra 2026: आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रेत ‘प्लास्टिक’ला नो-एन्ट्री; नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:48 IST

जिल्हा परिषदेचा ‘स्वच्छ यात्रोत्सव’ संकल्प 

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून यंदाचे प्रसिद्ध यात्रोत्सव ‘पर्यावरणपूरक’ पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. दि. ९ फेब्रुवारी रोजी होणारा आंगणेवाडी यात्रोत्सव आणि दि. १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान होणारा कुणकेश्वर यात्रोत्सव यावेळी पूर्णपणे ‘सिंगल युज प्लास्टिकमुक्त’ असणार आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा कचरा रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कडक नियमावली तयार केली आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी यात्रोत्सव काळात स्वच्छतेचे नियोजन करण्यासाठी मालवण आणि देवगडच्या गटविकास अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. यात्रेतील स्टॉलधारकांकडून ‘स्वच्छता कर’ आणि ‘स्वच्छता डिपॉझिट’ आकारले जाणार आहे. जर व्यापाऱ्यांनी आपल्या परिसरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले, तरच ही डिपॉझिट रक्कम परत केली जाईल. अन्यथा, सिंगल युज प्लास्टिक आढळल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.जैविक कचऱ्यासाठी कंपोस्ट खड्डे यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींच्या माध्यमातून तात्पुरते कंपोस्ट खड्डे तयार करण्यात येणार आहेत. हॉटेल व्यावसायिकांना निळ्या व हिरव्या कचरा पिशव्यांचे वाटप केले जाईल. मंदिर परिसरात ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात येणार असून सोशल मीडिया आणि बॅनरद्वारे भाविकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

प्रशासनाचे ‘क्लीन’ नियोजनदंडात्मक अस्त्र: प्लास्टिक बंदी अधिनियमानुसार प्रतिबंधात्मक वस्तू आढळल्यास थेट दंड.कचरा वर्गीकरण: ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी स्टॉलधारकांना विशेष पिशव्यांचे वाटप.स्वच्छता डिपॉझिट: व्यापाऱ्यांनी कचरा व्यवस्थापन केल्यास डिपॉझिट परत मिळणार.देखरेख: पंचायत समितीच्या माध्यमातून भरारी पथकांचे लक्ष राहणार.

भाविकांसाठी ‘ग्रीन’ प्रोटोकॉलकापडी पिशव्या: भाविकांनी घरूनच कापडी पिशव्या सोबत आणण्याचे आवाहन.पर्यायी वस्तू: प्लास्टिक ग्लासेस आणि थर्माकोल ताटांऐवजी कागदी किंवा पत्रावळीचा वापर.सहभाग: शाळा, मंदिर आणि समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सक्रिय सहभाग.आवाहन: ‘प्लास्टिकमुक्त यात्रोत्सव’ यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे प्रशासनाचे विनंती.

English
हिंदी सारांश
Web Title : No Plastic at Anganewadi, Kunkeshwar Yatra; Fines for Violators

Web Summary : Sindhudurg district bans single-use plastic at Anganewadi and Kunkeshwar Yatras. Strict rules, fines for violations, and cleanliness deposits for vendors are in place. Compost pits, waste segregation, and public awareness campaigns are planned to ensure a plastic-free festival. Visitors are encouraged to use cloth bags.