Sindhudurg ZP Election: सिंधुदुर्गात तीन दिवसांत एकही अर्ज दाखल नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:48 IST2026-01-20T13:48:05+5:302026-01-20T13:48:25+5:30

महायुतीचे ठरले, महाविकास आघाडीचे ठरेना

No application has been filed for Zilla Parishad, Panchayat Samiti in Sindhudurg in three days | Sindhudurg ZP Election: सिंधुदुर्गात तीन दिवसांत एकही अर्ज दाखल नाही

Sindhudurg ZP Election: सिंधुदुर्गात तीन दिवसांत एकही अर्ज दाखल नाही

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू झाली असून ती २१ पर्यंत चालणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवार (दि.१९) रोजी तिसऱ्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसाठी किंवा आठही पंचायत समितीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

१६, १७ आणि १९ जानेवारी या कालावधीत जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी ३४१ तर पंचायत समितीच्या १०० जागांसाठी ४६५ असे एकूण तब्बल ८०६ अर्ज उचलण्यात आले आहेत. आता प्रत्यक्षात मंगळवार आणि बुधवार अशा शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता आहे.

महायुतीचे ठरले, महाविकास आघाडीचे ठरेना

जिल्ह्यात भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुतीचे जागा वाटपही झाले आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीने आपली भूमिकाच मांडलेली नाही. महायुती झाल्याने भाजप आणि शिंदेसेनेतील नाराजांना एकत्र करून महाविकास आघाडी आपले उमेदवार निश्चित करणार असल्याची राजकीय चर्चा सध्या सुरू आहे.

Web Title : सिंधुदुर्ग ZP चुनाव: तीन दिनों में एक भी नामांकन नहीं।

Web Summary : सिंधुदुर्ग जिला परिषद चुनाव में पहले तीन दिनों में शून्य नामांकन दाखिल हुए। 806 आवेदन पत्र जमा होने के बावजूद, किसी भी उम्मीदवार ने आधिकारिक तौर पर पंजीकरण नहीं कराया है। महायुति का सीट-बंटवारा अंतिम रूप ले चुका है, जबकि महाविकास अघाड़ी की रणनीति अस्पष्ट है, जिससे अटकलें लग रही हैं।

Web Title : Sindhudurg ZP Election: No nominations filed in three days.

Web Summary : Sindhudurg Zilla Parishad elections see zero nominations filed in first three days. Despite 806 application forms collected, no candidates have officially registered. Mahayuti seat-sharing is finalized, while Mahavikas Aghadi's strategy remains unclear, leading to speculation.