शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

आवडीची शिक्षण व्यवस्था हवी : महाजन

By admin | Updated: January 13, 2015 00:15 IST

प. ए. सोसायटीतर्फे सत्कार : बर्वे यांच्या कला दालनाचे उद्घाटन उत्साहात

चिपळूण : विद्यार्थ्यांच्या जीवनात रंगत येईल, त्यांचे जीवन फुलून जाईल, यासाठी त्यांच्या आवडीच्या कलागुणांना वाव देण्याची गरज असून, त्यापद्धतीने शिक्षण व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले. लोकमान्य टिळक वाचन मंदिराच्या शतायु गं्रथालये व ग्रंथकार अधिवेशनानिमित्त चिपळूण दौऱ्यावर आलेल्या लोकसभेच्या अध्यक्षा महाजन यांचा परशुराम एज्युकेशन सोसायटीतर्फे सत्कार करण्यात आला. युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महाजन यांच्या हस्ते मधुकाका बर्वे कलादालनाचा शुभारंभ करण्यात आला. लोकसभेच्या अध्यक्षा महाजन म्हणाल्या की, आज मधुकाका बर्वे यांच्या कलादालनाचे उद्घाटन आपल्या हस्ते झाले. मात्र या कलादालनाला बर्वे काकांचेच नाव का दिले असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला असेल. त्यावेळी कलाशिक्षक म्हणून माजलेकर होते. मग त्यांचेच नाव का असा प्रश्न पडला असेल परंतु, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बर्वे यांनी दिला. यावेळी माजी आमदार नाना जोशी, संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.विनय नातू, डॉ.जयंत मेहेंदळे, शरद साठे, सुधाकर भागवत, मनिष भागवत, मकरंद जोशी, सरोज नेने, भाजपचे युवा नेते माधव गवळी, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. शांताराम बुरटे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)