शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्लेतील राष्ट्रवादीचे १२ नगरसेवक अपात्र

By admin | Updated: September 11, 2014 23:05 IST

नगरपरिषद बरखास्तीच्या उंबरठ्यावर

सिंधुदुर्गनगरी : वेंगुर्ले नगरपरिषद नगराध्यक्ष निवडप्रक्रियेत गटनेत्यांनी काढलेला व्हीप धुडकावल्याप्रकरणी विद्यमान नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांच्यासह पाचजणांना, तर स्वेच्छेने पक्ष सोडल्याप्रकरणी वामन कांबळे यांच्यासह सातजणांना अशा एकूण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील बाराही नगरसेवकांना जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी अपात्र ठरविले आहे. यामुळे वेंगुर्ले नगरपरिषद बरखास्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये एकूण १७ नगरसेवक असून, यापैकी तब्बल १२ नगरसेवक अपात्र ठरल्याने ही नगरपरिषद अल्पमतात आली आहे. त्यामुळे नगरपरिषद बरखास्त करावी, या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठविला असल्याने नगरपरिषद आता बरखास्तीच्या उंबरठ्यावर आली आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांनी हा निर्णय ९ सप्टेंबर रोजी दिला असून त्या दिवसापासूनच १२ ही नगरसेवक अपात्र झाले आहेत. नगरसेवकांना अपात्र केल्याचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला असून नगरपरिषद बरखास्तीसंदर्भातील निर्णय शासन घेणार आहे, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात हे सर्व बाराही नगरसेवक उच्च न्यायालयात अपील दाखल करू शकतात.वेंगुर्ले नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक ११ डिसेंबर २०११ रोजी झाली. यावेळी १७ नगरसेवकांपैकी १२ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘घड्याळ’ या अधिकृत निवडणूक चिन्हांवरून लढून विजयी झाले होते. त्यानंतर नम्रता कुबल व रमण वायंगणकर हे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले. मात्र, त्यानंतर २५ जून २०१३ रोजी त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. यानंतर पुढील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीवरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले. यातील एका गटाने गटनेते वामन कांबळे यांनी बजावलेला पक्षाचा व्हीप धुडकावला, तर राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग पक्षनिरीक्षक किरण पावसकर यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी बोलावलेल्या सभेस अनुपस्थित राहिल्याने पक्षविरोधी कारवाई केली असा ठपका ठेवत दोन्ही गटांतील बाराही नगरसेवकांना अपात्र करण्यात आले आहे.व्हीप धुडकावल्याने कारवाईपक्षाने निश्चित केलेले गटनेते वामन कांबळे यांनी या निवडणुकीत पूजा कर्पे यांना मतदान करावे यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना व्हीप बजावला होता. हा धुडकावल्याचे सिद्ध झाल्याने प्रसन्ना कुबल, चेतना केळुसकर, पद्मिनी सावंत, अन्नपूर्णा नार्वेकर, सुलोचना तांडेल या पाचही नगरसेवकांना अपात्र ठरविले आहे. (प्रतिनिधी)यांच्यावरही कारवाईपक्षनिरीक्षक किरण पावसकर यांनी राष्ट्रवादीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी बोलावलेल्या सभेकडे पाठ फिरविल्याने तसेच विरोधी पक्ष राष्ट्रीय काँग्रेस तसेच मनसे यांची मदत घेत नगराध्यक्ष म्हणून निवडून येणे आदी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी गटनेते वामन कांबळे, पूजा कर्पे, नम्रता कुबल, अवधूत वेंगुर्लेकर, शैलेश गावडे, मनीष परब, फिलोमिना कार्डोस या सातजणांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे.