शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पेयजल योजना : सिंधुदुर्ग जिल्ह्यात  दहा कोटी रुपये अद्यापही अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 13:46 IST

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत २८ योजना व ३१ वाड्यांच्या उद्दिष्टापैकी १० योजना व १० वाड्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत या कामांवर ५ कोटी १७ लाख एवढा निधी खर्च करण्यात आला असून उर्वरित सुमारे १० कोटी रुपये अद्यापही अखर्चित आहेत. हा संपूर्ण निधी खर्च करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च ही आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता समितीच्या सभेत माहितीनिधी खर्च करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत २८ योजना व ३१ वाड्यांच्या उद्दिष्टापैकी १० योजना व १० वाड्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत या कामांवर ५ कोटी १७ लाख एवढा निधी खर्च करण्यात आला असून उर्वरित सुमारे १० कोटी रुपये अद्यापही अखर्चित आहेत. हा संपूर्ण निधी खर्च करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च ही आहे.जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता समितीची मासिक सभा अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिश पाटील, उपाध्यक्ष रणजित देसाई, विषय समिती सभापती अंकुश जाधव, अनिषा दळवी, जेरॉन फर्नांडिस, सदस्य श्वेता कोरगावकर, सरोज परब, उत्तम पांढरे, प्रमोद कामत, मायकल डिसोजा, अधिकारी तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.२०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्याला १५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर होता. यात २८ योजना व ३१ वाड्यांचे उद्दिष्ट होते. यापैकी अद्यापपर्यंत १० योजना व १० वाड्यांचे पेयजलचे काम पूर्ण झाले असून यावर ५ कोटी १७ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. तर अद्यापही १८ योजना व २१ वाड्यांची कामे होणे बाकी आहे.

यासाठी १० कोटी रुपये निधी शिल्लक आहे. पेयजलची कामे करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद पाटील यांनी दिली.यावर्षीचा पाणीटंचाई आराखडा ४ गावे व ५१३ वाड्यांचा बनविण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातून ४६९ पपत्र अ प्राप्त झाली आहेत. पपत्र ब साठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. १३८ अंदाजपत्रके जिल्ह्याला प्राप्त झाली असून विविध टंचाईच्या कामांची ३४ पपत्रे अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत. या अंदाजपत्रकांना मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे श्रीपाद पाताडे यांनी सांगितले.स्वच्छ भारत अंतर्गत जिल्ह्यात अद्यापही २४४२ जणांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे समोर येत आहे. जानेवारीपासून ६६९६ जणांकडे शौचालय नव्हते. मात्र, त्यानंतर ४२५४ जणांनी शौचालय बांधून पूर्ण केले आहे. ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबनिहाय शौचालय असणे आवश्यक आहे.सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कुडाळमध्ये सर्वाधिक दूषित विहिरीआरोग्य विभागाने जारी केलेल्या एका अहवालात जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये १० टक्केपेक्षा जास्त दूषित पाणीनमुने आढळून आले आहेत. तर उर्वरित चार तालुक्यांमध्ये पाणी नमुने समाधानकारक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. दूषित पाणी नमुने शुद्ध करून ते पिण्यायोग्य करण्यात आले आहेत.... थकीत ५ कोटी प्राप्तगतवर्षी पाणीटंचाईअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची बिले निधीअभावी रखडली होती. त्यामुळे ठेकेदारांमधून नाराजीचा सूर होता. जिल्हा परिषदेच्यावतीने यासाठी पाठपुरावा केला जात होता. अखेर दोन टप्प्यात हे पैसे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत. यातील पहिल्या टप्प्यात २ कोटी ९४ लाख रुपये तर दुसऱ्या टप्प्यात २ कोटी रुपये असे एकूण ४ कोटी ९४ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. संबंधित ठेकेदारांचे पैसे देण्याचे काम सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता श्रीपाद पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीsindhudurgसिंधुदुर्ग