शहरं
Join us  
Trending Stories
1
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
2
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
3
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
4
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
5
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
6
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
7
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
8
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
9
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
10
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
11
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
12
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
13
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
14
म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
15
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
16
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
17
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
18
Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन
19
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
20
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
Daily Top 2Weekly Top 5

नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्प : कामबंद आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 15:50 IST

नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नरडवे भैरवगाव, यवतेश्वर, जांभळगाव, पिंपळगाव, दुर्गानगर या गावांमधील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. विविध मागण्या सरकार दरबारी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे नरडवे धरण प्रकल्पाचे सुरू असलेले काम ९ डिसेंबरला बंद पाडणार असल्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांच्यावतीने नरडवे धरणग्रस्त समन्वय समितीच्यावतीने प्रशासनास देण्यात आला आहे.

ठळक मुद्देनरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्प कामबंद आंदोलनाचा इशारा

कणकवली : नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नरडवे भैरवगाव, यवतेश्वर, जांभळगाव, पिंपळगाव, दुर्गानगर या गावांमधील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. विविध मागण्या सरकार दरबारी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे नरडवे धरण प्रकल्पाचे सुरू असलेले काम ९ डिसेंबरला बंद पाडणार असल्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांच्यावतीने नरडवे धरणग्रस्त समन्वय समितीच्यावतीने प्रशासनास देण्यात आला आहे.

कामबंद आंदोलनाबाबत कणकवली पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. आंदोलनासंदर्भात मुंबई येथे २४ नोव्हेंबर रोजी धरणग्रस्तांची बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या न सुटल्याने शासनाविरोधात तीव्र असंतोष असल्याचे स्पष्ट झाले.

नरडवे धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त नोकरीधंद्यानिमित्त गावाबाहेर असल्याने मागण्यांकडे दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे गावातील प्रकल्पग्रस्त व बाहेरील यांची एकत्रित बैठक घेऊन ९ डिसेंबर रोजी कामबंद आंदोलन छेडण्यात येणार आहे.

त्याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात प्रकल्पग्रस्तांनी म्हटले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणsindhudurgसिंधुदुर्ग