भाजपा राज्यातील सरकार पाडायचे तेव्हा पाडणार, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 22:24 IST2020-02-18T22:22:44+5:302020-02-18T22:24:31+5:30

Narayan Rane : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली.

Narayan Rane warns Uddhav Thackeray about Mahavikas Aghadi Government | भाजपा राज्यातील सरकार पाडायचे तेव्हा पाडणार, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा 

भाजपा राज्यातील सरकार पाडायचे तेव्हा पाडणार, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा 

सिंधुदुर्ग - माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारबाबत मोठे विधान केले आहे. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबतही मोठे भाकीत केले आहे. भाजपा राज्यातील सरकार जेव्हा पाडायचे तेव्हा पाडणार. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आव्हान देण्याची गरज नाही, असे राणे यांनी म्हटले आहे.  

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली. त्यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबतही मोठे भाकीत केले. भाजपा राज्यातील सरकार जेव्हा पाडायचे तेव्हा पाडणार. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आव्हान देण्याची गरज नाही. सध्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. काल रत्नागिरीमध्ये भास्कर जाधव यांच्या कृतीमधून हा असंतोष दिसला होता. एकंदरीत परिस्थिती पाहता राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात, '' असे भाकीतही राणेंनी केले. 

 ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील विकासकामांसाठी कुठलाही निधी देण्याची घोषणा केलेली नाही. सी वर्ल्ड प्रकल्पाला एकेकाळी शिवसेनेने विरोध केला होता. मात्र आता त्या प्रकल्पाची बांधणी खासगी गुंतवणुकीतून करण्याची तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी कोकणाबाबत माहिती घेतली पाहिजे. चिपी विमानतळाच्या कामाबाबत राज्य सरकाक कमी पडत आहे.  त्यांच्या आजच्या कोकण दौऱ्यातून कोकणाला काय मिळाले हा प्रश्नच आहे. सिंधुदुर्गात मुख्यमंत्री नव्हे, पर्यटक आले होते, असे नारायण राणे म्हणाले.  तसेच खासदार म्हणून मुख्यमंत्र्यांना मदत करण्यास कधीही तयार असल्याचेही राणेंनी सांगितले. 
 

Web Title: Narayan Rane warns Uddhav Thackeray about Mahavikas Aghadi Government