मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता; केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी नारायण राणेंना दिले आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:34 IST2025-08-12T17:33:43+5:302025-08-12T17:34:34+5:30
कणकवली : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि सिंधुदुर्गवासीयांना विमानाने मुंबईतून आता जिल्ह्यात येता येणार आहे. मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची ...

मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता; केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी नारायण राणेंना दिले आश्वासन
कणकवली : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि सिंधुदुर्गवासीयांनाविमानाने मुंबईतून आता जिल्ह्यात येता येणार आहे. मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची विमानसेवा लवकरच पुन्हा सुरू होणार आहे.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ही सेवा तत्काळ पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे. खासदार नारायण राणे यांनी या सेवेच्या पुनरुज्जीवनासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेत, जिल्ह्यात मुंबई - सिंधुदुर्ग विमानसेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती.
खासदार नारायण राणे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री राममोहन नायडू यांची भेट घेतली. या भेटीच्या दरम्यान, मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई ही महत्त्वपूर्ण विमानसेवा तातडीने सुरू करण्याची भूमिका मांडली.
कोकणातील जनतेला होणारा त्रास आणि गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन, ही सेवा लवकरात लवकर सुरू होणे कसे महत्त्वाचे आहे, हे त्यांनी मंत्र्यांना पटवून दिले. खासदार नारायण राणे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, मंत्री राममोहन नायडू यांनी ही सेवा तत्काळ पूर्ववत करू असे आश्वासन दिले आहे.