शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण : जानवली पुलाचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 6:08 PM

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. त्याअंतर्गत कोकणच्या दळणवळण क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या जानवली नदीवरील पुलाचे ...

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण : जानवली पुलाचे काम प्रगतीपथावरब्रिटिशकालीन पूल इतिहासजमा, दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. त्याअंतर्गत कोकणच्या दळणवळण क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या जानवली नदीवरील पुलाचे दुसऱ्या टप्प्यातील कामदेखील प्रगतीपथावर आहे.कणकवली शहरालगत गडनदी तसेच जानवली नदीवर ब्रिटिशकालीन पूल होते. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाअंतर्गत या दोन्ही नद्यांवरील पूल इतिहासजमा करण्यात आले. त्याजागी नवीन सिमेंट काँक्रिटच्या पुलांची उभारणी करण्यात आली आहे. गडनदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले असून जानवली नदीवरील दुसऱ्या टप्प्यातील पुलाचे काम सुरू आहे.सन १९३४ मध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पूल वाहतुकीस खुले झाले होते. त्यानंतर अनेक वर्षे या पुलांवरून कित्येक टन अवजड वाहतूक सुरू होती. ब्रिटिश काळात उभारलेले हे पूल समर्थपणे सेवा बजावत होते.मुंबई ते गोव्यापर्यंत दळणवळणाच्या मूलभूत सुविधांची उभारणी करताना तत्कालीन ब्रिटिश शासनाने १९३० मध्ये नदीपात्रांवर पुलांची उभारणी सुरू केली. तर १९३४ ते १९४३ पर्यंत या पुलांची कामे पूर्ण झाली. या पुलांमुळे रस्तामार्गे वाहतुकीला चालना मिळाली. त्याच बरोबर समुद्रकिनारी असलेल्या बंदरातून बोट तसेच अन्य मार्गाने होणारी वाहतूक बंद झाली.रस्ते तसेच पूल उभारले गेल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांदगाव, तळेरे, कणकवली, ओरोस, कसाल आदी छोट्या मोठ्या नव्या बाजारपेठा उदयास आल्या. तसेच कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या शहरांचेही महत्त्व वाढले.आॅगस्ट २०१६ मध्ये पुरात सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचा काही भाग वाहून गेल्यानंतर महामार्गावरील सर्वच ब्रिटिशकालीन पूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्याचे शासनाने निश्चित केले. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात नवीन पुलांची कामे झाल्यानंतर जुने ब्रिटिशकालीन पूल पाडण्यात आले. मात्र, या पुलांशी निगडित अनेक आठवणी असून जुन्या जाणत्या लोकांकडून त्या ऐकायला मिळतात.दरम्यान, कणकवली शहरालगतच्या जानवली नदीवर पुलाचे दोन टप्प्यात काम करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे. तर दुसºया टप्प्यातील काम सध्या सुरू आहे. या पुलाचे वाय बिम पूर्ण झाले असून त्यावरील स्लॅबचे काम करण्याच्यादृष्टीने नियोजन सध्या सुरू आहे.अनेक पूर झेलूनही पूल राहिले होते मजबूतकणकवली शहरालगत गडनदी आणि जानवली नदीवरील पुलांची कामे १९३० मध्ये सुरू झाली. यातील जानवली पुलाला त्यावेळी १ लाख ३७ हजार ६६९ रुपये खर्च आला होता. तर गडनदी पुलाचे बांधकाम १ लाख २६ हजार रुपयांमध्ये पूर्ण झाले होते.

दोन्ही पुलांवरून १९३४ मध्ये वाहतूक सुरू झाली. महत्त्वाची बाब म्हणजे महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पुलाचा अपवाद वगळता गडनदी आणि जानवली नदीसह महामार्गावरील इतर ब्रिटिशकालीन पूल गेल्या अनेक वर्षांत अवजड वाहने आणि अनेक पूर झेलूनही मजबूत राहिले होते. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग