शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण, अंडरपासला अखेर मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 16:07 IST

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करीत असताना कणकवलीत जानवली नदी पूल ते नरडवे नाक्यापर्यंत उड्डाणपूल करण्यात येत आहे. या उड्डाणपुलाअंतर्गत गांगोमंदिरजवळ अंडरपास करावा अशी मागणी कणकवलीतील नागरिकांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन अंडरपासला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर यांनी दिली.

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण, अंडरपासला अखेर मंजुरीमागणीची दखल घेतल्याची माहिती

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करीत असताना कणकवलीत जानवली नदी पूल ते नरडवे नाक्यापर्यंत उड्डाणपूल करण्यात येत आहे. या उड्डाणपुलाअंतर्गत गांगोमंदिरजवळ अंडरपास करावा अशी मागणी कणकवलीतील नागरिकांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन अंडरपासला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर यांनी दिली.गेले चार दिवस गांगोमंदिरजवळ मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम बंद पाडले होते. जोपर्यंत गांगोमंदिर येथील अंडरपासची मंजुरी देत नाही, तोपर्यंत काम चालू देणार नाही असा इशारा शिशिर परुळेकर व अन्य नागरिकांच्यावतीने प्रशासन तसेच ठेकेदार कंपनीला देण्यात आला होता.

गांगोमंदिर येथील अंडरपास मंजुरीसाठी खासकरून आमदार नीतेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी प्रयत्न केले. अंडरपासमुळे भविष्यात शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मदत होणार आहे.

१० मीटर रुंदी व ५ मीटर उंची असलेल्या अंडरपासचे काम रविवारी रात्रीपासून सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी शासकीय अधिकारी व दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गांगोमंदिर येथील अंडरपासच्या जागेची पाहणी केली. यावेळी नागरिकांना रविवारी मध्यरात्रीपासून एस. एम. हायस्कूल ते जानवली पुलापर्यंत सर्व्हिस रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन ठेकेदार कंपनीने दिल्याची माहिती शिशिर परुळेकर यांनी दिली.अडीच कोटींचा प्रस्तावनगराध्यक्ष समीर नलावडे यांनीदेखील या अंडरपाससाठी आंदोलन केले होते. शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या पाहणी दौºयात संदेश पारकर, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, महेश सावंत या नेत्यांनीदेखील अंडरपाससाठी पाठपुरावा केला होता. पुन्हा एकदा आंदोलनात्मक भूमिका घेतल्यामुळे दिलीप बिल्डकॉनचे जनरल मॅनेजर के. गौतम यांनी वरिष्ठ पातळीवर अडीच कोटींचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग