शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

बचतगटांनी मार्केटिंगसाठी आधुनिक तंत्र जोपासावे

By admin | Updated: August 12, 2015 23:21 IST

नीतेश राणे : फोंडाघाट येथे हिरकणी लोकसाधन संस्थेचा मेळावा

कणकवली : बचतगटांनी आपल्या दर्जेदार उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी आधुनिक तंत्राचा वापर करावा. सोशल मीडिया आणि वेबसाईटच्या माध्यमातून आपली उत्पादने आणि कार्य घराघरापर्यंत पोहोचवा, असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी केले.फोंडाघाट येथे आयोजित हिरकणी लोकसाधन संस्थेच्या सहाव्या वार्षिक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हिरकणी महिला संस्थेच्या अध्यक्ष संजीव देसाई, उपाध्यक्ष सुमित्रा कांबळे, राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, नगरसेविका मेघा गांगण, कणकवली सभापती आस्था सर्पे, उपसभापती बाबासाहेब वर्देकर, माजी जिल्हा परिषद सभापती संदेश सावंत, पंचायत समिती सदस्य बबन हळदिवे, स्वरुपा विखाळे, श्रीया सावंत, दादा कर्ले, महिला आर्थिक विकास महामंडळाचे सचिन कांबळे, फोंडाघाट सरपंच आशा सावंत, तुळशीदास रावराणे, विभागीय अध्यक्ष राजू रावराणे, संतोष आगे्र, जयू पटेल, वाघेरी सरपंच संतोष रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते.आमदार नीतेश राणे पुढे म्हणाले, सोशल मीडियातून महिला बचतगटांनी आपल्या व्यवसायाचे मार्केटींग केले पाहिजे. या मार्केटींगचे तंत्र अवगत करून घ्या आणि लोकांना जे पदार्थ आवडतील त्याची निर्मिती करा. बाजारपेठेत चालणाऱ्या अशा ५० पदार्थांची निर्मिती करून त्यांना आकर्षक पॅकिंग करा. बाजारपेठेतील अन्य वस्तूंशी तुमच्या मालाची सहज स्पर्धा होईल. दिवसेंदिवस बाजारात अनेक नामांकित कंपन्याची उत्पादने येत आहेत. त्या उत्पादनांची स्पर्धा महिला बचतगटांनी केली पाहिजे. महिला बचतगटांना आवश्यक त्या उद्योग-व्यवसायांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब बचतगटांनी केला पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. या बँकेतून बचतगटांना आवश्यक प्रमाणात कर्ज मर्यादा वाढवून दिली जाईल, असे आश्वासनही आमदार राणे यांनी दिले. हिरकणी महिला संस्थेने निस्वार्थी वृत्तीने केलेले काम कौतुकास्पद आहे. संघटनेचा उपयोग आर्थिक उन्नतीसाठी करणे महत्त्वाचे आहे. पंचायत समिती सभापती आस्था सर्पे म्हणाल्या, शासनातर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. अनेक महिला बचतगट कुक्कुटपालन, शेळीपालन, भाजी लागवड अशी उत्पादने घेत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी सचिन कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन हिरकणी गटसाधन केद्र्राच्या व्यवस्थापक सीमा गावडे यांनी केले. यावेळी हिरकणी महिला संस्थेच्या उपाध्यक्ष सुमित्रा कांबळे, सचिव विशाखा भोगटे, मंगला रावराणे, श्रद्धा चोरगे, भक्ती उंबळकर, भारती नारींग्रेकर, स्नेहल कुडतरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)