मोबाईल चोर कोल्हापुरातून ताब्यात, मालवण पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 16:01 IST2021-07-07T15:49:55+5:302021-07-07T16:01:21+5:30
Crimenews Sindhudurg : तारकर्ली एमटीडीसी येथून पर्यटकांचा मोबाईल चोरी प्रकरणातील संशयित आरोपीला मंगळवार, ६ जुलै रोजी मालवण पोलिसांनी कोल्हापूर येथून ताब्यात घेतले. त्याला अटक करून मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे.

मोबाईल चोर कोल्हापुरातून ताब्यात, मालवण पोलिसांनी केली अटक
मालवण : तारकर्ली एमटीडीसी येथून पर्यटकांचा मोबाईल चोरी प्रकरणातील संशयित आरोपीला मंगळवार, ६ जुलै रोजी मालवण पोलिसांनीकोल्हापूर येथून ताब्यात घेतले. त्याला अटक करून मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे.
तारकर्ली एमटीडीसी येथे २ मार्च रोजी पर्यटन सफरीवर आलेल्या नाशिक येथील पर्यटक शेखशोएब शेख सलीम यांचा सॅमसंग कंपनीचा १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल ३ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास चोरीस गेला होता.
समुद्र किनारी असलेल्या गजीबो येथून मोबाईल चोरीस गेला होता. याप्रकरणी शेख शोएब यांनी मालवण पोलीस ठाण्यात मोबाइल चोरीची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष शिवगण तपास करत होते.
चोरीस गेलेल्या मोबाईलचे सीडीआर तपासण्यात आले. मोबाईल लोकेशन कोल्हापूर येथे दिसून आले. प्राप्त लोकेशननुसार शिवा शिवगण व धोंडू जानकर यांचे पथक सोमवार, ५ जुलै रोजी कोल्हापूर येथे दाखल झाले. मोबाईल चोरीप्रकरणी संशयित पवन नामदेव कुसाळे (२९, रा. शांतीउद्यान आपटेनगर, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले. मंगळवार, ६ जुलै रोजी संशयित पवन याला मालवण पोलीस ठाणे येथे आणून चौकशीअंती अटक करण्यात आली. चोरीस गेलेला मोबाईलही पोलिसांनी जप्त केला.