शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

मनसेने निवडणुका लढवाव्या

By admin | Updated: July 21, 2014 23:21 IST

कार्यकर्त्यांची मागणी : पक्षनिरीक्षकांची सिंधुदुर्गात बैठक

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेच्यावतीने निवडणुका लढविण्यात येत नसल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून यामुळे कार्यकर्ते विखुरले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात निवडणुका लढविण्यात याव्यात. यासाठी कुडाळ, मालवण विधानसभा मतदार संघात उमेदवार उभा करण्याची मागणी मनसेचे कुडाळ, मालवण मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी झालेल्या पक्षनिरीक्षकांच्या बैठकीत केली. मनसेतर्फे उमेदवारीसाठी हेमंत जाधव, शिरीष सावंत यांच्यासह तिघांची नावेही यावेळी सूचविण्यात आली. मात्र, पक्षनिरीक्षकांची बैठक असूनही राजीनामा दिलेल्या दाभोलकर गटातील पदाधिकारी उपस्थित नसल्याने हा चर्चेचा विषय ठरला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चाचपणी करण्यासाठी कुडाळ, मालवण विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक पक्षनिरीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षनिरीक्षक शिवाजी नलावडे, आमदार नितीन सरदेसाई, पुणे मनसे नेते दीपक पायगुडे, कोकण विभाग संपर्कप्रमुख परशुराम उपरकर, जयप्रकाश बाविस्कर, कोकण संपर्कप्रमुख शिरीष सावंत, धीरज परब, महिला जिल्हाध्यक्ष भारती रावराणे, चैताली भेंडे, जिल्हा संपर्कप्रमुख चेतन कदम, कुडाळ तालुकाध्यक्ष बाबल गावडे, महिलाध्यक्ष सुवर्णा मुंज, मालवण तालुकाध्यक्ष नारायण कुबल आदी उपस्थित होते. या बैठकीला राजीनामा दिलेल्या गटातील माजी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, उपजिल्हाध्यक्ष राजेश पडते, प्रसाद गावडे यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्ते अनुपस्थित असल्याने बैठकीच्या ठिकाणी याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. (वार्ताहर)राज ठाकरेंचे सिंधुदुर्गकडे दुर्लक्ष--- यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात पदाधिकारी निहाय आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आपल्या नाराजीच्या भावना व्यक्त केल्या. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यावर दुर्लक्ष केले जात आहे. मनसेच्यावतीने निवडणुका लढविल्या जात नसल्याने कार्यकर्ते विखुरले जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुडाळमधून कोकण संपर्क नेते शिरीष सावंत, हेमंत जाधव, बाळा पावसकर यांना उमेदवारी द्यावी, असे सूचविण्यात आले. या मतदार संघातील विविध समस्यांचा आढावा घेत असताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या मतदार संघात विकासात्मक प्रकल्प होत नसल्याने जनतेमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे सांगितले. सध्याचे राजकीय घडामोडींचे वातावरण मनसेसाठी पोषक असून त्या अनुषंगाने याबाबत गांभीर्याने विचार व्हावा, असे मत व्यक्त करण्यात आले.