शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

आचऱ्यात जन्म झाल्याचे सार्थक

By admin | Updated: December 23, 2014 23:43 IST

विद्याधर करंदीकर : ‘क्षण आनंदाचे, दिवस गावपळणीचे’ छायाचित्र प्रदर्शन

आचरा : आचरावासीयांच्या एकजुटीला मनापासून धन्यवाद देतो. गावपळणीविषयक अनेक चांगल्या संकल्पनांची येथे चर्चा झाली. आपला जन्म आचऱ्यात झाल्याने सार्थकी लागल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विद्याधर करंदीकर यांनी बोलताना व्यक्त केले.डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘क्षण आनंदाचे दिवस गावपळणीचे’ हा आचरा गावपळणीवर आधारीत छायाचित्र प्रदर्शन व शब्दचित्र संमेलन अशा स्वरूपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, पत्रकार महेश सरनाईक, संतोष वायंगणकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, चंद्रकांत सामंत, कवी व साहित्यिक मधुसुदन नानिवडेकर, आचरा सरपंच मंगेश टेमकर, पोलीस ठाण्याचे महेंद्र शिंदे, नंदकिशोर महाजन, भरत जोशी आदी उपस्थित होते. गावातील गावपळणीची मजा लुटलेल्या साटम यांनी त्यांनी अनुभवलेली गावपळण ग्रामीण बोलीभाषेतील ओव्या म्हणून व्यक्त केल्या. राजू केळकर यांनी आपल्या ९५ वर्षाच्या वयोवृद्ध आजीची गोष्ट सांगितली. विलास सक्रू यांचे मालवणी काव्य भाव खाऊन गेले. संस्थेचे महालदार अरविंद सावंत यांनी गावपळणीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाशझोत टाकला. आचरा गावातील जगन्नाथ भावे, मुकुंद घाडी, निकिता कांबळी, अनिल करंजे आदींनी आपण अनुभवलेली गावपळण आपल्या मनोगतातून व्यक्त केली. दुसऱ्या सत्रामध्ये महेंद्र पराडकर, अमित खोत, प्रफुल्ल देसाई, भूषण मेथर, कृष्णा ढोलम आदींनी गावपळणीचे वृत्तांकन करताना त्यांना आलेले अनोखे अनुभव कथन केले. पत्रकारांच्या सहकार्याने ही गावपळण योग्यतऱ्हेने सर्वदूर पोहोचली, याकरिता पत्रकारांचे आभार मानण्यात आले. गावपळण कार्यक्रमामध्ये आपले कर्तव्य बजावताना खाकीवर्दीतील माणुसकी जपणाऱ्या आचरा पोलीस ठाण्याच्या महेंद्र शिंदे यांची आपण आचरा गावपळण अनभवून धन्य झाल्याचे मत व्यक्त केले. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध धर्माचे सर्व आचरावासीय गावपळणीत गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे प्रतिपादन जुबेर काझी व लक्ष्मण आचरेकर यांनी केले. आचरा गावची एकता कशी अबाधित आहे, याचे प्रत्यंतर आपल्या मनोगतातून दाखविले. सूत्रसंचालन सुरेश ठाकूर यांनी केले. (वार्ताहर)