शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगड जिल्हा निर्मितीच्या हालचाली

By admin | Updated: November 6, 2014 22:06 IST

महसूल व वन विभागाची गांधी यांना माहिती

खेड : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांची पुनर्रचना करून मंडणगड हा नवीन जिल्हा करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे़ नव्या जिल्हा विभाजनाचे निकष ठरविण्याबाबत महसूल व वन विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती मंत्रालयातील महसूल व वनविभागाचे कक्ष अधिकारी शरद डाके यांनी लेखी पत्राद्वारे दिली आहे़ खेड येथील मंडणगड जिल्हा निर्माण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अभिजीत गांधी यांनी लेखी पत्राद्वारे याबाबत ही माहिती मागितली होती. त्याबाबतचे लेखी पत्र गांधी यांना प्राप्त झाले आहे़ मंडणगड जिल्हा निर्मिती करण्यासंबंधात विभाजनाचे निकष ठरविण्याबाबत महसूल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय क्ऱ २०१४ /प्रक्र. ८७/म-१० दि. २४ जून २0१४ च्या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आल्याची माहिती या पत्रात दिली आहे़ अ‍ॅड. गांधी यांनी आपल्या पत्रात मंडणगड जिल्ह्याच्या निर्मितीमागील आवश्यकता आपल्या पत्रात विषद केली होती़ रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांना जिल्ह्याचे ठिकाण तसे दूरवर आहे. जिल्ह्याच्या एका टोकाला हे तालुके आहेत़ तसे खेड, दापोली आणि मंडणगड हे तालुके रत्नागिरी जिल्ह्याच्या एका टोकाला आहेत़ हे तालुके मागास राहीले आहेत़ या तालुक्यांचे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर न्यायालय हे रत्नागिरी येथे आहे़ खेड, दापोली आणि मंडणगड हे तालुके जिल्ह्याच्या एका टोकाला आहेत़ संपर्काच्या दृष्टीने अवघड होत असल्याने हे तालुके आजही मागास राहिले आहेत. शासकीय कामे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे आहे, अशीच परिस्थिती श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांची आहे़ भौगोलिक रचनेमुळे तसेच खर्चाचे दृष्टीने अधिक व सर्वसामान्यांना न परवडणारे असल्याने बहुतांश लोकांवर अन्याय होत आहे. दोन्ही जिल्ह्यांतील या ८ तालुक्यांना मंडगणगड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे मंडणगड हा नवा जिल्हा केल्यास या भागातील सर्व प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे़ अशा आशयाच्या या पत्राचा मंत्रालयीन पातळीवर विचार झाल्याने समाधान व्यक्त होत आहे़ एक प्रकारे मंडणगड या नव्या जिल्ह्याच्या निर्मितीकडे प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक असून, लवकरच याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी अ‍ॅड. गांधी यांनी केली आहे. गांधी यांना आलेल्या पत्रातून मंडणगडच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय भविष्यात महत्त्वाचा ठरू शकतो. (प्रतिनिधी)