Maharashtra Floods : सिंधुदुर्ग-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 14:38 IST2019-08-13T14:36:51+5:302019-08-13T14:38:44+5:30
पुराचे पाणी ओसरताच तब्बल नऊ दिवसांनी सिंधुदुर्ग–कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.

Maharashtra Floods : सिंधुदुर्ग-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत
वैभववाडी - पुराचे पाणी ओसरताच तब्बल नऊ दिवसांनी सिंधुदुर्ग–कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. मंगळवारी (13 ऑगस्ट) सकाळी कोल्हापूर–पणजी गाडी करुळ घाटमार्गे वैभववाडीत पोहचली. तर खासगी वाहतूकही सुरू झाली आहे. सर्वत्र मुसळधार पावसाने अक्षरशा हाहाकार माजवला.
पावसाचा फटका सिंधुदुर्ग–कोल्हापूर मार्गाला मोठ्या प्रमाणात बसला. गगनबावडा तालुक्यात चार ते पाच ठिकाणी पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने 5 ऑगस्टपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वैभववाडी व गगनबावडा तालुक्यात अवजड वाहने अडकून पडली होती. तब्बल नऊ दिवस वाहन चालकांना गाडीमध्येच ताटकळत राहावे लागले. अतिवृष्टीत या मार्गाचीही दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे पडले आहेत तर साईडपट्टी तुटून गेल्या आहेत. या अतिवृष्टीत या मार्गाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.