-महेश सरनाईक, सिंधुदुर्ग प्रख्यात पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे अनुसंधान आणि अहवाल त्यांच्या निधनानंतर ही कोकणातीलपर्यावरणीय संरक्षणाच्या संघर्षाला स्थायी प्रेरणा देत आहेत. गाडगीळ आयोगाच्या शिफारशींनी सिंधुदुर्ग आणि संपूर्ण कोकणाच्या पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, विशेषतः पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी त्यांनी अतुलनीय योगदान दिले आहे.
७ जानेवारी २०२६ ला माधव गाडगीळ यांचे निधन झाले. त्यानंतर मागील पंधरा वर्षात त्यांनी पर्यावरणाचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी केलेले मार्गदर्शन सिंधुदुर्गवासीयांच्या डोळ्यासमोर उभे राहिले.
माधवराव गाडगीळ यांनी रचलेले मार्गदर्शक तत्व, विशेषतः ‘सह्याद्री पर्यावरण अहवाल’, पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमांना नेहमीच बळ देत राहील. त्यांच्या अहवालाने खाणकाम, बांधकाम आणि वननाशामुळे निर्माण झालेले धोके अधोरेखित केले असून, स्थानिकांनी त्यांचे कार्य स्मरणार्थ पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे.
पंधरा वर्षांचा सखोल अभ्यास
गाडगीळ यांनी १५ वर्षांच्या अथक अभ्यासातून पश्चिम घाटाच्या १५०० किमी क्षेत्रातील समस्या समजून घेतल्या व त्यावर उपाय सुचविले. त्यांच्या अहवालामुळे खाणकाम आणि मोठ्या उद्योगांवर निर्बंध घालण्याची शिफारस केली गेली, ज्यामुळे स्थानिक पर्यावरणीय धोके कमी करण्यास मदत झाली.
सिंधुदुर्गमधील पर्यावरण दिशादर्शक
गाडगीळ आयोगाच्या अहवालाने सिंधुदुर्गातील स्थानिक व्यावसायिकांना फळे, वनसंरक्षण, आणि हवामान बदल या मुद्द्यांशी जोडून व्यावसायिक व शाश्वत विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शन झाले. या अहवालातील शिफारशींनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (ESZ) म्हणून घोषित करण्याची प्रबळ मागणी केली होती, ज्यामुळे स्थानिक शेती-मत्स्य व्यवसायांचे रक्षण होईल, अशी अपेक्षा होती.
सिंधुदुर्गातील खाणकामाविरोधी लढा
गाडगीळ यांच्या शिफारशींनी सिंधुदुर्गातील खाणकामाविरोधी आंदोलनांना नवे आधार दिले आहेत. त्यांनी खाणकामामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय संकटांचा इशारा दिला होता. त्यांच्या सूचनांच्या आधारावरच स्थानिकांनी सनदशीर मार्गाने आपल्या हक्कांसाठी लढा दिला, ज्यात स्थानिक महिलांचा लक्षणीय सहभाग होता.
कोकणातील पर्यावरणीय संघर्षाला नवी ऊर्जा
गाडगीळ यांचे योगदान आजही मध्यवर्ती ठरत असून, पुढील पिढ्यांना पर्यावरणीय धोरणांसाठी दिशा दाखवण्याचे कार्य करेल, असा विश्वास स्थानिक आंदोलक व्यक्त करत आहेत. त्यांच्या कार्यामुळे कोकणातील पर्यावरणीय संघर्षाला एक नवी ऊर्जा शक्ती मिळाली आहे.
Web Summary : Madhav Gadgil's research continues to inspire Konkan's environmental protection. His report highlighted threats from mining and deforestation. Gadgil's recommendations aided locals in fighting for environmental rights and sustainable development in the ecologically sensitive zone.
Web Summary : माधव गाडगिल का शोध कोंकण के पर्यावरण संरक्षण को प्रेरित करता है। उनकी रिपोर्ट ने खनन और वनों की कटाई से खतरों को उजागर किया। गाडगिल की सिफारिशों ने पारिस्थितिक रूप से संवेदनशील क्षेत्र में पर्यावरण अधिकारों और सतत विकास के लिए लड़ने में स्थानीय लोगों की सहायता की।