आंबोली धबधब्याचा प्रवाह कमी, पर्यटकांची निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 12:51 IST2024-06-24T12:50:33+5:302024-06-24T12:51:09+5:30

आंबोली : गेल्या आठवडाभर मुसळधार कोसळल्यानंतर आंबोलीमध्ये पावसाने पुन्हा एकदा दांडी मारली आहे. त्यामुळे काहीसे प्रवाहित झालेल्या धबधब्यांचे प्रवाह ...

Low flow of Amboli falls, disappointment of tourists | आंबोली धबधब्याचा प्रवाह कमी, पर्यटकांची निराशा

आंबोली धबधब्याचा प्रवाह कमी, पर्यटकांची निराशा

आंबोली : गेल्या आठवडाभर मुसळधार कोसळल्यानंतर आंबोलीमध्ये पावसाने पुन्हा एकदा दांडी मारली आहे. त्यामुळे काहीसे प्रवाहित झालेल्या धबधब्यांचे प्रवाह कमी झाल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम रविवारी पर्यटनावर दिसून आला. रविवारी धबधब्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे पर्यटकांची निराशा झाली.

मागील आठवड्याच्या तुलनेत रविवारी आंबोलीत पर्यटक कमी प्रमाणात आले होते. या पर्यटकांमध्ये कर्नाटक, बेळगाव, कोल्हापूर, सांगली तसेच काही प्रमाणात गोव्यातील पर्यटक दाखल झाले होते. आंबोली तसेच नजीकच्या परिसरात पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: Low flow of Amboli falls, disappointment of tourists