शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

लोटेत ९४ कंपन्या प्रदूषणकारी

By admin | Updated: January 14, 2015 00:32 IST

आरोग्य समिती सभा : पर्यावरण मंत्र्यांना सादर करणार यादी

रत्नागिरी : लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणकारी ९४ कंपन्यांची यादी जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या आरोग्य समितीच्या सभेत सादर करण्यात आली़ मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करी असल्याने ही यादी राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांकडे सादर करुन कारवाई करण्याची मागणी करण्याचा निर्णय आजच्या आरोग्य समितीच्या सभेत घेण्यात आला़ ही सभा सभापती डॉ़ अनिल शिगवण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ या सभेत जिल्ह्यात सुरु असलेल्या रासायनिक कंपन्यांसंदर्भात जोरदार चर्चा झाली़ लोेटे येथे कंपन्यांकडून सुरु असलेल्या प्रदूषणावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही़ त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेबद्दल सभेत सभापतींसह सर्वच सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभेला नेहमीच अनुपस्थित राहतात़ आजच्या सभेलाही आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित नव्हते़ या मंडळाने ९४ प्रदूषणकारी कंपन्यांची यादी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत आरोग्य समितीच्या सभेत सादर करण्यात आली़ प्रदूषण मंडळाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याबद्दल सभापतींसह सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला़ यावेळी प्रदूषण मंडळाने प्रदूषणकारी कंपन्यांवर काय कारवाई केली, असा प्रश्न उपस्थित केला़ कंपन्यांनीही प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केली, याबाबत आरोग्य विभागाने संपर्क साधून त्याची पाहणी करण्याच्या सूचना यासभेत देण्यात आली़ त्याचबरोबर प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाईचा ठराव मंजूर करुन तो पर्यावरणमंत्र्यांकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला़ आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती व कुपोषित बालकांवर या सभेत चर्चा करण्यात आली़ या सभेला समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते़ (शहर वार्ताहर)लोेटे येथील प्रदुषणावर कोणाचे नियंत्रण नसल्याचा आरोप.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेबद्दल सभेत तीव्र नाराजी.प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभेला नेहमीच अनुपस्थित राहत असल्याचा मुद्दा उपस्थित.