Sindhudurg: दादागिरी महागात पडली, पुण्याच्या पर्यटकांना स्थानिकांकडून चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 17:17 IST2025-05-03T17:17:00+5:302025-05-03T17:17:29+5:30

ओरोस : पुण्याहून जीवाची गोवा करण्यास आलेल्या आणि पुन्हा पुण्याला परत जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गनजीक एका सीएनजी पंपावर ...

Locals beat up Pune tourists for bullying at a CNG pump near the highway in Sindhudurg district | Sindhudurg: दादागिरी महागात पडली, पुण्याच्या पर्यटकांना स्थानिकांकडून चोप

Sindhudurg: दादागिरी महागात पडली, पुण्याच्या पर्यटकांना स्थानिकांकडून चोप

ओरोस : पुण्याहून जीवाची गोवा करण्यास आलेल्या आणि पुन्हा पुण्याला परत जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गनजीक एका सीएनजी पंपावर केलेली दादागिरी या सर्व पर्यटकांना महागात पडली आणि गोव्यातील नशा सिंधुदुर्गात उतरली. मात्र हे सर्व महाविद्यालय विद्यार्थी असल्याने आणि त्यांचे भविष्य बाद होऊ नये या उदात्त हेतूने जिल्हावासीयांनी त्यांना केवळ चोप देऊन सोडून दिले.

पुणे येथून काही तरुण पर्यटक गोव्याला पर्यटनासाठी गेले होते. गोव्यात पर्यटन केल्यानंतर हे पर्यटक सिंधुदुर्ग मार्गे पुन्हा गोव्याला जाण्यासाठी निघाले. हे पर्यटक सिंधुदुर्गातील महामार्ग नजीक असलेल्या एका सीएनजी पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी थांबले या पंपावरील कर्मचाऱ्यांनी सीएनजी भरण्यासाठी गाडीत असलेल्या सर्वांना खाली उतरण्यास सांगितले. मात्र हे सर्व पर्यटक खाली उतरण्यास तयार झाले नाहीत. त्याबरोबरच त्यांनी त्या पेट्रोल पंपावरील त्या कर्मचाऱ्याला शिव्या देण्यास सुरुवात केली.

यानंतर तिथे उपस्थित असलेल्या काही जणांनी गाडीतून खाली उतरा तर सीएनजी भरेन असे सांगितले. मात्र त्यांनाही ते ऐकले नाहीत. उलट शिव्या देत त्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. हे पाहताच आजूबाजूच्या रिक्षाचालक तसेच स्थानिकांनी संबंधित पर्यटकांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन कारमधून आलेल्या सर्व पर्यटकांनी खाली उतरून मारण्यास सुरुवात केली.
 
शेवटी यातील काही पर्यटकांनी आपल्या गाड्यांमध्ये बसून तिथून पळ काढला. मात्र पाच ते सहा जण स्थानिकांच्या हातात सापडले. त्यांना चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र हे पर्यटक महाविद्यालयीन विद्यार्थी होते. या राड्यामध्ये गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Locals beat up Pune tourists for bullying at a CNG pump near the highway in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.