Sindhudurg: थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाटात साडेतीन लाखांची दारू जप्त, एकजणावर गुन्हा दाखल

By सुधीर राणे | Updated: December 30, 2023 16:34 IST2023-12-30T16:34:12+5:302023-12-30T16:34:44+5:30

कणकवली: कणकवली पोलिसांनी फोंडाघाट मध्ये थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत दारू साठ्यावर मोठी कारवाई केली आहे. यात साडेतीन लाखांची गोवा बनावटीचा दारूसाठा ...

Liquor worth three and a half lakhs seized in Fondaghat in the wake of Thirty First | Sindhudurg: थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाटात साडेतीन लाखांची दारू जप्त, एकजणावर गुन्हा दाखल

Sindhudurg: थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाटात साडेतीन लाखांची दारू जप्त, एकजणावर गुन्हा दाखल

कणकवली: कणकवली पोलिसांनी फोंडाघाट मध्ये थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत दारू साठ्यावर मोठी कारवाई केली आहे. यात साडेतीन लाखांची गोवा बनावटीचा दारूसाठा कणकवली पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी रामचंद्र दत्ताराम तांबे फोंडाघाट, हवेलीनगर याच्यावर अवैध दारूसाठा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फोंडाघाट येथे माळरानावर लपवून ठेवलेल्या दारू साठ्याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला. यात साडेतीन लाखाचा दारू साठा जप्त केला. कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्यासह पोलिस हवालदार उत्तम वंजारे,  उर्मिला मांजरेकर, पोलिस शिपाई किरण मेथे, आगाव यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.

Web Title: Liquor worth three and a half lakhs seized in Fondaghat in the wake of Thirty First