शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग: चिंदर-तेरई डोंगरामध्ये भूस्खलन, घरांना धोका वाढला; प्रशासन सुस्तच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 16:47 IST

गेल्या वर्षीची भूस्खलन घटना ताजी असताना पुन्हा यावर्षीही भूस्खलन झाले असून मागील वर्षी घटना घडूनही प्रशासन स्थानिक आमदार यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही.

आचरा : सतत कोसळणाऱ्या पावसाचा फटका चिंदर तेरईला बसला आहे. तेथील डोंगर खचू लागला असून उत्तम घागरे यांच्या घरामागील बाजूच्या पडवीवर मोठया प्रमाणत भूस्खलन होऊन दगड मातीचे ढीग येऊन धडकले आहेत. घराच्या काही भिंतीना तडे जाऊन जमिनीला तडे गेले आहेत.या घरातील कुटुंबिय मुंबईला गेले असल्याने घर बंद अवस्थेत आहे. समोरील मांगराच्या सर्व चिरेबंदी भिंतींसह जमिनीला भेगा पडल्या असून मांगर कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटने नंतर महसूल प्रशासनाने घागरे यांच्या बंद घरावर धोकादायक परिस्तिथीमुळे स्थलांतरीत होण्याची नोटीस चिकटवली आहे.चिंदर तेरई येथील उत्तम घागरे यांच्या घरालगतचा डोंगर खचण्याची घटना मागील वर्षी जुलै महिन्यात घडली  होती त्यावेळी त्यावेळीही घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते याचबरोबर घरा बाजूने जाणाऱ्या रस्त्याचीही ऊंची वाढण्याची घटना घडली होती. घागरे कुटूंबिय कामानिमित्त मुंबईला गेले असून त्याचे घर बंद आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या घरामागील डोंगराचा भाग कोसळून घरावर सरकत असल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले.  घरामागील बाजूच्या पडवीवर मोठया प्रमाणत भूस्खलन होऊन दगड मातीचे ढीग येऊन धडकले होते. घराच्या काही भिंतीना तडे जाऊन जमिनीला तडे गेले आहेत.  समोरील मांगराच्या सर्व चिरेबंदी भिंतींसह जमिनीला भेगा पडल्या असून मांगर कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.  सदर घटनेची माहिती ग्रामपंचायला देत याबाबतची माहिती महसूल प्रशासनास दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच चिंदर सरपंच राजश्री कोदे, उपसरपंच दीपक सुर्वे, सदस्य शशिकांत नाटेकर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर, ग्रामस्थ रवी घागरे सुभाष सावंत किशोर खोत, पोलीस पाटील दिनेश पाताडे दाखल झाले होते.कोणतीही दखल न घेतल्याने ही पुनरावृत्तीगेल्या वर्षीची भूस्खलन घटना  ताजी असताना पुन्हा यावर्षीही भूस्खलन झाले असून मागील वर्षी घटना घडूनही प्रशासन स्थानिक आमदार यांनी कोणतीही उचल घेतलेली नाही. मागील वर्षी  आमदार तसेच महसूल प्रशासन कडून पाहणी करण्यापलीकडे कोणतेही काम झालेले नाही.गेल्या वर्षी घटना  घडल्यानंतर प्रशासनाला सक्तीच्या सूचना देऊन तात्काळ महसूल प्रशासन कडून उपाय योजना अथवा यावर पर्याय काढणे गरजेचे होते मात्र यावर्षीचा पावसाळा अर्ध्यावर आला तरी यावर कोणतीही दखल न घेतल्याने पुन्हा ही पुनरावृत्ती झाली आहे. महसूल प्रशासन फक्त नोटीसा बजावत आपली जबाबदारी झटकत असल्याचे सांगत चिंदर सरपंच राजश्री कोदे यांनी पाहणी दरम्यान संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसlandslidesभूस्खलन