विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना कोकण रेल्वेचा दणका!, अडीच कोटींचा दंड वसूल

By सुधीर राणे | Published: May 22, 2024 01:47 PM2024-05-22T13:47:48+5:302024-05-22T13:49:17+5:30

कणकवली : गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. या तपासणीत एप्रिल २०२४ मध्ये १५,१२९ ...

Konkan Railway has collected a fine of 2 crores from the passengers traveling without tickets | विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना कोकण रेल्वेचा दणका!, अडीच कोटींचा दंड वसूल

विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना कोकण रेल्वेचा दणका!, अडीच कोटींचा दंड वसूल

कणकवली : गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. या तपासणीत एप्रिल २०२४ मध्ये १५,१२९  प्रवासी विनातिकीट असलेले आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.  तसेच त्यांच्याकडून २,६९,८५,२५६ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.  

कोकण रेल्वेमधील  विनातिकीट प्रवाश करणाऱ्यांकडून वसूल करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करावा असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे. पुढील  काळातही कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणी मोहिम सातत्याने सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी,तसेच कोणीही तिकीटाशिवाय प्रवास करु नये,असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Konkan Railway has collected a fine of 2 crores from the passengers traveling without tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.