शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

सीएनजी भरून परतताना खारेपाटणच्या तरुणाचा जागीच अंत; वळणावर रिक्षा उलटली

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 27, 2026 15:53 IST

नडगिवेचे जीवघेणे वळण अन् काळाचा घाला

खारेपाटण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगिवे येथील सिद्धिविनायक हॉटेलसमोरील ते अवघड वळण पुन्हा एकदा रक्तलांछित ठरले आहे. सीएनजी गॅस भरून तळेरे येथून खारेपाटणकडे परतणाऱ्या संदीप दिलीप पाटील (४२, रा. खारेपाटण रामेश्वरनगर) यांची रिक्षा रविवारी रात्री १२:००च्या सुमारास पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने खारेपाटण परिसरावर शोककळा पसरली आहे.

संदीप पाटील हे स्वतःची रिक्षा (एमएच ०७ एएच ५२८४) चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रविवारी रात्री ११:००च्या सुमारास ते तळेरे येथील पंपावर सीएनजी गॅस भरण्यासाठी गेले होते. गॅस भरून परतत असताना, नडगिवे येथील अवघड वळणावर त्यांचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा भीषणपणे पलटी झाली. या अपघातात संदीप यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्राव झाला. माजी सरपंच रमाकांत राऊत आणि पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.चौकट

वळण की मृत्यूचा सापळा?

नडगिवे येथील हे वळण तांत्रिकदृष्ट्या अत्यंत धोकादायक मानले जाते. रात्रीच्या वेळी महामार्गावर प्रकाशाची पुरेशी व्यवस्था नसल्याने आणि वळणाचा नेमका अंश (Degree) लक्षात न आल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतो. संदीप यांच्या बाबतीतही रात्रीच्या अंधारात वळणावर वेग मर्यादेचा किंवा वळण घेण्याच्या अंतराचा अंदाज चुकला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. महामार्गावरील असे 'ब्लॅक स्पॉट' आता सर्वसामान्यांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहेत.

कष्टकरी कुटुंबाचा डोलारा कोसळला

संदीप पाटील हे अत्यंत कष्टाळू व्यक्तिमत्व होते. रिक्षा चालवण्यासोबतच त्यांनी काही महिन्यापूर्वी रिक्षा दुरुस्तीचा छोटा गॅरेज व्यवसाय सुरू केला होता. त्यांची पत्नी समृद्धी पाटील या खारेपाटण आरोग्य केंद्रात 'आशा स्वयंसेविका' म्हणून कार्यरत आहेत. पती - पत्नी कष्ट करून मुलांचे भविष्य घडवत असतानाच काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कणकवली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अधिक तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kharepatan Youth Dies in Auto Rickshaw Accident After CNG Refill

Web Summary : Sandeep Patil died near Nadgive after his auto rickshaw overturned. He was returning from a CNG refill. A dangerous turn and lack of lighting contributed to the accident, leaving behind his wife and two children.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात