शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

क्यारचा ६८ हजार १७४ शेतकऱ्यांना फटका, भातपिक क्षेत्राचे पंचनामे अखेर पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 15:10 IST

क्यार वादळाने पडलेल्या पावसामुळे बाधित झालेल्या भातपिक क्षेत्राचे अखेर पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे पूर्ण करून त्याचा अंतिम अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३० हजार १५ हेक्टर ६४ गुंठ्याचे पंचनामे करण्यात आले असून यामुळे ६८ हजार १७४ शेतकरी बाधित झाले आहेत.

ठळक मुद्देक्यारचा ६८ हजार १७४ शेतकऱ्यांना फटका, भातपिक क्षेत्राचे पंचनामे अखेर पूर्णअंतिम अहवाल शासनाकडे पाठविला; जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा मात्र घटला

सिंधुदुर्गनगरी : क्यार वादळाने पडलेल्या पावसामुळे बाधित झालेल्या भातपिक क्षेत्राचे अखेर पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे पूर्ण करून त्याचा अंतिम अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३० हजार १५ हेक्टर ६४ गुंठ्याचे पंचनामे करण्यात आले असून यामुळे ६८ हजार १७४ शेतकरी बाधित झाले आहेत.

भातशेती नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असेल तरी ६ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण झालेल्या क्षेत्राचे नुकसान १३८ कोटींच्यावर गेले होते. मात्र, आता बाधित क्षेत्र वाढलेली असताना नुकसानीचा आकडा मात्र घटला आहे. हा आकडा १२४ कोटी ७८ लाख ६८ हजार रूपयांवर आला आहे.क्यार वादळामुळे कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या भातपिकाचे पूर्णत: नुकसान झाले होते. त्यामुळे येथील भातशेतीचे तत्काळ पंचनामे करावेत. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसानी शेतकऱ्यांना द्यावी.

भातशेतीसाठी शेतकऱ्यांनी २०१९-२० मध्ये घेतलेले ८० कोटींचे कर्ज माफ करावे, अशी मागणी जिल्ह्यातील राजकीय व्यक्ती, शेतकरी व सामाजिक संस्था यांनी उचलून धरली होती. त्यानंतर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांना पाहणीसाठी पाठविले होते. शिवसेना पक्षाचे युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनीही जिल्ह्यात येत नुकसानीची पाहणी केली.यावेळी दोघांनीही शेतकऱ्यांना सर्व नुकसानी मिळेल, असा विश्वास दिला होता. त्यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात हंगामी शेती नुकसानीसाठी १० हजार कोटींची रक्कम जाहीर करीत ६ नोव्हेंबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. सिंधुदुर्गात मात्र पंचनामे करणारी यंत्रणा तोकडी असल्याने ७ नोव्हेंबर ही तारीख पंचनामे पूर्ण करण्यास उजाडली.उभ्या भातपिकाचे सर्वाधिक नुकसानजिल्ह्यात २०१९-२० या हंगामी कालावधीत भातशेतीखाली ५७ हजार ३२३ हेक्टर क्षेत्र आले होते. आॅक्टोबरात लागलेल्या पावसाने यातील २९ हजार ६८७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून ६२ हजार १२५ शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल राज्य शासनाला कृषी अधीक्षक कार्यालयाने पाठविला होता. यातील ७ नोव्हेंबरपर्यंत ३० हजार १५ हेक्टर ६४ गुंठे क्षेत्राचे पंचनामे पूर्ण केले आहेत. यात ६८ हजार १७४ शेतकरी बाधित झाले आहेत.

या पंचनाम्यामध्ये काढणी पश्चात भातपिकाचे ५ हजार ६ हेक्टर ७३ गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले आहे. १४ हजार ७०५ शेतकरी बाधित झाले आहेत. मात्र, उभ्या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. २५ हजार ८ हेक्टर ९८ गुंठे क्षेत्राचे हे नुकसान असून तब्बल ५३ हजार ४६९ शेतकरी बाधित झाले आहेत.

टॅग्स :cycloneचक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्ग