शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाला हिरवा कंदील?

By admin | Updated: February 25, 2015 00:06 IST

रेल्वे बजेट : सातारकरांना लागली उत्सुकता

सातारा : दिल्लीच्या रेल्वे बजेटमध्ये सातारा जिल्ह्याला काय मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या मागण्यांपैकी कऱ्हाड-चिपळूण नवीन लोहमार्गाला हिरवा कंदील मिळणार काय, याबद्दल सातारकरांना अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.सातारा रेल्वे स्टेशनचे अद्यावतीकरण करावे, रेल्वेस्टेशनवर महिलांसाठी स्वतंत्र प्रतिक्षालय बांधावे, सातारा ते कोल्हापूर डबलट्रॅक करावा, कराड-चिपळुण नवीन लोहमार्ग विकसित करावा, सातारा जिल्ह्याातील मसूर, रहिमतपूर आणि वाठार येथे रेल्वे ओव्हर ब्रिज उभारण्यात यावेत आदी प्रमुख मागण्यांसह रेल्वे प्रशासन गतीमान आणि सक्षम करण्याबाबतच्या सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभागातील संसद सदस्यांच्या बैठकीत केल्या. राज्य शासनाने ५० टक्के खर्च उचलण्याची तयारी दर्शविल्याने एकूण ९२० कोटी रुपयांचा व सुमारे १११ कि. मी. लांबीच्या चिपळूण-खेर्डी-कोयनानगर-पाटण-कऱ्हाड असा नवीन लोहमार्ग प्रस्ताव २०१० साली रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे, तो पूर्णत्वास जाणे गरजेचे आहे. दिल्ली-मुंबई-बेंगलोर असा कॅरिडॉर नजीकच्या काळात होत आहे. त्यामुळे पुणे- कोल्हापूर या दरम्यान आता असलेल्या सिंंगल रेल ट्रॅक ऐवजी डबल रेल ट्रॅकची उभारणी करावी, त्यामुळे रेल्वे गाड्यांंच्या सुविधा संख्येत आणखी वाढ करता येईल आणि रेल्वे क्रॉसिंंगकरिता वाया जाणारा वेळ वाचेल, सातारा रेल्वे स्थानकावरुन दररोज ४४ रेल्वे गाड्यांची ये-जा सुरु असते, त्यामानाने एकंदरीत रेल्वे स्थानकाला नवीन रुपडे देणे गरजेचे आहे, त्याकरीता सातारा रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करावे, प्रवासी महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालय उभारावे, सातारा जिल्ह्यातील मसूर, रहिमतपूर आणि वाठार येथे रेल्वे आव्हर ब्रीज उभारण्यात यावेत, रेल्वेच्या वेळेत, रेल्वेचीच सातारा शहर ते रेल्वेस्टेशन अशी बस सेवा सुरु करावी, अशा अनेक मागण्या आजपर्यंत वेळोवेळी केल्या गेल्या आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनीही रेल्वेच्या बैठकीत याचा पाठपुरावा केला आहे. (प्रतिनिधी)