शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
3
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
4
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
5
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
6
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
7
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
8
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
9
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
10
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
11
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
12
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
13
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
14
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
15
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
16
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
17
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
18
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
19
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
20
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

जगबुडी पूल प्रश्न मार्गी?

By admin | Updated: January 14, 2015 00:43 IST

बेचाळीस गावांचा प्रश्न : राजकीय साठमारीत महत्त्वाचा प्रश्न राहिला मागे

श्रीकांत चाळके -खेड तालुक्यातील अठरा गाव धवडेबांदर विभागातील ४२ गावांचे जीवनमान पुन्हा एकदा धोक्यात आले आहे़ मात्र, सुकिवली येथील जगबुडी नदीवरील पुलाला मंजुरी देणारे रामदास कदम मंत्री झाल्याने या भागातील ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या मार्गावरील सुकिवली येथील चोरद नदीवरील पुलाचे घोंगडे यावर्षीदेखील भिजत राहणार असल्याने, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ सुमारे २ कोटी रूपयांच्या या कामाला निधी मंजूर होऊनही राजकीय श्रेयासाठी पुलाचे काम रखडले आहे. आघाडी सरकारच्या काळात या पुलाला हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. मात्र काम ठप्पच राहिले. पूर्वी रामदास कदम यांनीच या पुलाच्या कामास मंजुरी दिली होती. आता तेच मंत्री झाल्याने, हे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गेली ५० वर्षे या पुलावरून पावसाळ्यात धोकादायक वाहतूक सुरू आहे़ या पुलाची उंची कमी असल्यामुळे, पुलावर पावसाळ््यात तीन ते चार फूट पाणी असते. त्यामुळे आसपासच्या ४२ गावांचा दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. पुलावरील पाणी दोन दोन दिवस राहत असल्याने, गंभीर परिस्थिती निर्माण होते. पावसाळ््यात अन्य मार्ग नसल्याने बहुसंख्य लोकांच्या दैनंदिन दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. रहदारी ठप्प होते. वाहतूक ठप्प होेते. २००४ व २००५ मधील महापुरात येथे मोठी आर्थिक हानी झाली होती. लाखो रूपयांचे नुकसान झाले होते. अनेकांची शेतीही वाहून गेली होती. सातत्याने येत असलेल्या या पुरामुळे परिसरातील सर्व उद्योग बंद पडतात़. येथील जगबुडी व चोरद नदीतील पाण्यामुळे या पुलालाही धोका निर्माण झाला आहे़ याबाबत सातत्याने आवाज उठवल्यानंतर बांधकाम विभागाच्या अभियंत्याकरवी या पुलाच्या परिस्थितीची पाहणी करण्यात आली होती़ दोन वर्षांपूर्वी ऐन पावसाळ्यात या पुलाच्या बांधकामाबाबत घोषणा करण्यात आली होती़ त्यावेळी शिवसेनेच्यावतीने पुलाच्या बांधकामासाठी विशेष प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले होते़ तर राष्टवादी काँग्रेसच्यावतीने या पुलाला आम्ही मंजुरी दिल्याचे सांगत, लवकरच हे काम सुरू होणार असल्याचे संकेत दिले होते़ प्रत्यक्षात मात्र या पुलाला रामदास कदम असतानाच मंजुरी देण्यात आल्याचे उघड झाले आहे़ भास्कर जाधव यांनी मंत्री असतानाच, हे काम तातडीने सुरू करण्याचे संकेत दिले होते़ आता १ वर्ष उलटून गेले़ तरीही पुलाच्या कामास प्रारंभ झाला नाही़ बांधकाम कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे़ कदम यांच्या विशेष प्रयत्नाने हे काम आता लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.