झाराप -तिठा परिसरात दुचाकी व कार अपघातात दुचाकीस्वार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 12:52 IST2019-06-03T12:48:16+5:302019-06-03T12:52:03+5:30

कुडाळ येथील झाराप-तिठा परिसरातील एकेरी मार्गावर ओव्हरटेक करत असताना दुचाकीची समोरून येणाऱ्या कारला धडक बसून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.हा अपघात आज सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास घडला. राजेंद्र जांभोरे रा.देवगड-पाडगाव असे जखमीचे नाव आहे.त्याला प्राथमिक उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Jharap - Two-wheeler in a wheelchair and a car accident in the district of Chhatarpur | झाराप -तिठा परिसरात दुचाकी व कार अपघातात दुचाकीस्वार गंभीर

झाराप -तिठा परिसरात दुचाकी व कार अपघातात दुचाकीस्वार गंभीर

ठळक मुद्देझाराप -तिठा परिसरात दुचाकी व कार अपघातात दुचाकीस्वार गंभीरकुडाळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद

कुडाळ : येथील झाराप-तिठा परिसरातील एकेरी मार्गावर ओव्हरटेक करत असताना दुचाकीची समोरून येणाऱ्या कारला धडक बसून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.हा अपघात आज सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास घडला. राजेंद्र जांभोरे रा.देवगड-पाडगाव असे जखमीचे नाव आहे.त्याला प्राथमिक उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की जखमी दुचाकीस्वार जांभोरे हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन गोव्याच्या दिशेने जात होता.तर समोरून येणारी अपघातग्रस्त कार नेमळे येथून देवगडच्या दिशेने जात होती.

दरम्यान, दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडला आहे.या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून याचा अधिक तपास पोलीस हवालदार डुमिंग डिसोझा करीत आहेत.

Web Title: Jharap - Two-wheeler in a wheelchair and a car accident in the district of Chhatarpur