जानवलीचा अपघात ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामामुळे ! ; परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 02:43 PM2020-11-10T14:43:09+5:302020-11-10T14:45:09+5:30

mumbaigoa highway, parsaramuparkar, sindhudurg, accident मुंबई - गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढलेली आहे. या सर्वच अपघातांची नोंद होत नसल्यामुळे या महामार्गावरील धोक्याची तीव्रता जाणवत नाही. जानवली येथे झालेला अपघात हा ठेकेदाराचे नियोजनशून्य तसेच निकृष्ट कामामुळे झालेला आहे. तर एकही अपघात झाला नाही असे म्हणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी या अपघाताला जबाबदार कोण ते आता सांगावे. उगाच ठेकेदाराला पाठीशी घालणे सोडावे . असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले.

Janwali's accident due to unplanned work of the contractor! ; Parashuram Upkar | जानवलीचा अपघात ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामामुळे ! ; परशुराम उपरकर

जानवलीचा अपघात ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामामुळे ! ; परशुराम उपरकर

Next
ठळक मुद्देजानवलीचा अपघात ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामामुळे ! ; परशुराम उपरकर विनायक राऊत यांनी याला आता जबाबदार कोण ? ते सांगावे

कणकवली: मुंबई - गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढलेली आहे. या सर्वच अपघातांची नोंद होत नसल्यामुळे या महामार्गावरील धोक्याची तीव्रता जाणवत नाही. जानवली येथे झालेला अपघात हा ठेकेदाराचे नियोजनशून्य तसेच निकृष्ट कामामुळे झालेला आहे. तर एकही अपघात झाला नाही असे म्हणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी या अपघाताला जबाबदार कोण ते आता सांगावे. उगाच ठेकेदाराला पाठीशी घालणे सोडावे . असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, खासदार विनायक राऊत याना हा मार्ग लोकार्पण करण्याची घाई झाली आहे. मात्र या मार्गावर होणाऱ्या अपघातांकडे त्यांचे लक्ष नाही. आज जानवली येथे अपघात होऊन ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयानक होता कि दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सातत्याने या मार्गावर अपघात होत असून, काही अपघातांची नोंद होते तर काहींची होत नाही.


कणकवलीतच या महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या स्लॅबचा काही भाग पंचायत समितीजवळ शिवाजी पुतळ्याकडे कोसळला होता. त्या आधी कणकवली एस. एम. हायस्कुल समोर महामार्गाच्या भिंतीला तडे गेलेत. तर ६ ते ७ ठिकाणी भिंत कोसळली. यावेळी सत्ताधारी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी हि भिंत काढून टाकली जाणार असल्याचे सांगितले. अद्यापही याबाबतीत कोणतीही कारवाई झालेली नसताना खासदार राऊत याना लोकार्पणाची एवढी घाई का ? असा प्रश्नही परशुराम उपरकर यांनी विचारला आहे.

अपघाताच्या बाबतीत सेफ्टी एजन्सी काहीच पाहत नाही. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात या मार्गावर वाहतूकच नव्हती. जी काही होती ती अत्यंत तुरळक होती. त्यामुळे अशावेळी अपघात होणार कसे. हे आधी खासदार विनायक राऊत यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतरच या मार्गावर अपघात झाले नाहीत किंवा होत नाहीत असे वक्तव्य करावे.


आम्ही या मार्गाच्या विविध प्रश्नांबाबत आधीच मुंबई उच्च न्यायालयात गेलो आहोत. आता या मार्गावर होणारे अपघात आणि मार्गाचे नियोजन शून्य काम. तसेच मार्गाचे काम अपूर्ण असताना सत्ताधाऱ्यांना त्याचे लोकार्पण करण्याची झालेली घाई याबाबीही आम्ही आता न्यायालयाच्या लक्षात आणून देणार आहोत असेही परशुराम उपरकर यांनी

Web Title: Janwali's accident due to unplanned work of the contractor! ; Parashuram Upkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.