वैभववाडीतल्या मंदिराचा वाद चिघळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 05:19 AM2018-08-07T05:19:06+5:302018-08-07T05:19:15+5:30

कोकिसरे महालक्ष्मी मंदिराचा वाद अखेर चिघळला.

The issue of the temple of Vaibhavavadwala got swollen | वैभववाडीतल्या मंदिराचा वाद चिघळला

वैभववाडीतल्या मंदिराचा वाद चिघळला

Next

वैभववाडी : कोकिसरे महालक्ष्मी मंदिराचा वाद अखेर चिघळला. मंदिरातील पुजारी बदलण्याच्या मागणीसाठी २ महिन्यांपूर्वी मंदिराला ग्रामस्थांनी ठोकलेले टाळे विरोधी गुरव गटाने उघडल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा नोंदवून अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार व पोलिसांकडे केली. परंतु, दोघांनीही त्यांची मागणी धुडकावून लावली. त्यामुळे कोकिसरे ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको केला. दुपारी दीड तास तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या. ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पुन्हा आज सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांची भेट घेतली.

Web Title: The issue of the temple of Vaibhavavadwala got swollen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Templeमंदिर