शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
6
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
7
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
8
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
9
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
10
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
11
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
12
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
13
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
14
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
15
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
16
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
17
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
18
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
19
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
20
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
Daily Top 2Weekly Top 5

ईशानी पाटणकर ‘लिटील व्हॉईस आॅफ रत्नागिरी’

By admin | Updated: January 9, 2015 00:10 IST

रत्नागिरीकरांची गर्दी : कोसंबी, भिडेंच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

रत्नागिरी : आकर्षक रंगमंच, नेत्रदीपक लाईट इफेक्टस्, उत्तम दर्जाची उदयराज सावंत यांची साऊंड सिस्टिम आणि वादक कलाकारांच्या समर्पक साथसंगतीने सजलेल्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीची ईशानी पाटणकर ठरली ‘लिटील व्हॉईस आॅफ रत्नागिरी’. या रंगारंग स्पर्धेला रत्नागिरीकर रसिकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात भरभरुन गर्दी केली होती. संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांच्या उपस्थितीने तसेच प्रसिद्ध गायक प्रसेनजीत कोसंबी आणि कोकणकन्या शमिका भिडे यांच्या गायनाने या स्पर्धेची सांगता झाली.स्पर्धेत संगमेश्वरच्या गौतमी वाडकर हिने द्वितीय, तर देवरुखच्या सिद्धी शितूतने तृतीय क्रमांक पटकावला. प्राथमिक फेरीतून ११ स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते. ‘मराठी आणि हिंदी’ अशा दोन फेऱ्या झाल्यानंतर ईशानी पाटणकर, गौतमी वाडकर, सिद्धी शितूत, अनुष्का देवरुखकर, राधिका भिडे, विशारद गुरव या ‘टॉप-६’ची शेवटच्या फेरीसाठी निवड झाली. त्यानंतर झालेल्या एका फेरीतून या तीन विजेत्यांची निवड परीक्षक कमलेश भडकमकर आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी केली. ‘ओम ग्रुप’चे संयोजक अभिजीत गोडबोले यांनी या स्पर्धेची आखणी केली होती.स्पर्धकांना सिंथेसायझरसाथ राजू किल्लेकर, तबला - कोंगो साथ पांडुरंग बर्वे, ढोलक - ढोलकीसाथ केदार लिंगायत आणि आॅक्टोपॅडसाथ शिवा पाटणकर यांनी केली.पहिल्या फेरीपासूनच या स्पर्धेची रंगत वाढत गेली. प्रत्येक स्पर्धकाने उत्तमोत्तम गीते सादर करत रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. अशा प्रकारे रत्नागिरीत सादर झालेली ही पहिलीच स्पर्धा ठरली. त्यामुळे प्रतिवर्षी या स्पर्धेचे आयोजन ‘ओम ग्रुप’ आणि ‘दिल से क्रिएशन्स’ या ग्रुपने करावे, अशी मागणी प्रेक्षकांतून करण्यात आली. स्पर्धेच्या मध्यंतरात गायक प्रसेनजीत कोसंबी आणि शमिका भिडे यांच्या गाण्यांनी धमाल आणली. या स्पर्धेत स्पर्धकांची ओळख छायाचित्रकार परेश राजीवले यांनी छायाचित्रण करुन दृकश्राव्य माध्यमातून स्क्रिनवर दाखविली. तसेच नीलेश नांदगावकर यांनी रंगमंच सजावट केली. रत्नागिरीत असा उपक्रम बालकलाकारांसाठी घेतल्याबद्दल ‘ओम ग्रुप’ आणि ‘दिल से’ ग्रुपचे कौतुक केले. प्रत्येक शहरात ग्रुपची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)