शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

कोविड बिलाच्या तक्रारीवर कार्यवाहीच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 8:35 PM

CoronaVirus Sindhudurg : खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लाभ देण्याबाबत त्यांच्याकडील आरोग्य मित्रांकडून संबधित लाभाबाबत कोविड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अवगत करण्याच्या सूचना देवून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे .

ठळक मुद्देकोविड बिलाच्या तक्रारीवर कार्यवाहीच्या सूचनामनसेच्या उपजिल्हाध्यक्षाना प्रांताधिकाऱ्यांनी दिले पत्र

कणकवली: खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लाभ देण्याबाबत त्यांच्याकडील आरोग्य मित्रांकडून संबधित लाभाबाबत कोविड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अवगत करण्याच्या सूचना देवून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे .

देयकाबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी व संबंधितांना कळविण्याबाबत समितीस सूचना दिल्या असल्याचे पत्र प्रांताधिकाऱ्यांनी मनसेच्या उपजिल्हाध्यक्षाना दिले आहे . त्याचप्रमाणे निवासी नायब तहसीलदार तथा समन्वय अधिकारी तालुकास्तरीय समिती कणकवली , तालुका आरोग्य अधिकारी , सहाय्यक लेखाधिकारी ,पंचायत समिती यांनी आपल्या निवेदनातील कार्यवाहीच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तालुकास्तरीय समितीमार्फत पाहणी करणे व बिलांतील तफावतीच्या अनुषंगाने नियमानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे .१ जून ते २८ जूनपर्यंत एकूण १२५ रुग्णांना डिस्चार्ज दिलेले आहेत . त्यांना डिस्चार्ज देण्यापूर्वी प्रीऑडिट झाले आहे. त्यापैकी ६ रुग्णांच्या बिलात तफावत आढळलेली असल्याने संबधित रुग्णांना रक्कम परत करण्याच्या सूचनासंबंधित पेड कोविड हॉस्पिटल यांना कळविले आहे . मनसेच्या घंटानाद आंदोलनाच्या अनुषंगाने या कार्यालयात झालेल्या चर्चे दरम्यान प्राप्त झालेला वैभववाडी तालुक्यातील रुग्णाच्या नातेवाईकांचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे पाठविला आहे . वाढीव देयकाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास उचित कार्यवाही करण्यासाठी तालुकास्तरीय समितीस सूचना दिलेल्या आहेत , असे या पत्रात नमूद केले आहे . 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलMNSमनसेKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग