निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सीमेवर वाढीव बंदोबस्त, सावंतवाडीत अंतरराज्य बाॅर्डर परिषद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 09:14 IST2025-11-18T09:14:35+5:302025-11-18T09:14:49+5:30
Sawantwadi Election News: नगरपरिषद तसेच आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व गोवा पोलिसांची सावंतवाडीत अंतरराज्य बाॅर्डर परिषद सावंतवाडीत पार पडली यावेळी गोव्यातून येणारी अवैध दारू तसेच गुन्हेगाराचे वास्तव्य यावर प्रामुख्याने चर्चा झाली

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सीमेवर वाढीव बंदोबस्त, सावंतवाडीत अंतरराज्य बाॅर्डर परिषद
सावंतवाडी - नगरपरिषद तसेच आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व गोवा पोलिसांचीसावंतवाडीत अंतरराज्य बाॅर्डर परिषद सावंतवाडीत पार पडली यावेळी गोव्यातून येणारी अवैध दारू तसेच गुन्हेगाराचे वास्तव्य यावर प्रामुख्याने चर्चा झाली. तसेच निवडणूक काळात सिंधुदुर्ग च्या सीमेवर जादा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून सर्व वाहनाची कसून तपासणी केली जाईल असे गोवा पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या अंतरराज्य बॉर्डर परिषदेत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, गोवा डिचोली प्रभारी पोलिस उपअधीक्षक श्रीमती श्रीदेवी यांच्यासह सावंतवाडी पोलीस उपअधीक्षक कांबळे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण आदि सह. गोवा व सिंधुदुर्गातील वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अनुषंगाने, तसेच गोव्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अनुषंगाने दोन्ही राज्य पोलिसांमध्ये कारवाई व आरोपी देवाण-घेवाण तसेच गोवा व महाराष्ट्रात घडणारे विविध प्रकारचे गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले व रेकॉर्ड वरील आरोपी देवाण घेवाण व माहितीचे आदान प्रदान यावर मार्गदर्शन व चर्चा झाली.
आगामी दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीत पोलिसांनी गोवा व सिंधुदुर्गच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्याबाबत एक मत झाले तसेच वाढीव पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात येणार आहे सीमेवर पोलिसांकडून प्रत्येक वाहनांची तपासणी ही करण्यात येईल असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आली. गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक रोखण्यावर ही विचारमंथन झाले असून अनेक आरोपी हे गोव्यात गुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात वास्तव्य करतात ही बाब निदर्शनास आणण्यात आली.