शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची निष्क्रीयता; आरोपी फरार

By admin | Updated: May 16, 2014 00:20 IST

सावंतवाडी : शहरातील मसूरकर ज्वेलर्समधून चोरी करून पसार झालेल्या महिलांच्या सूत्रधाराला पोलिसांनी बीड देवराई येथून ताब्यात घेतले.

 सावंतवाडी : शहरातील मसूरकर ज्वेलर्समधून चोरी करून पसार झालेल्या महिलांच्या सूत्रधाराला पोलिसांनी बीड देवराई येथून ताब्यात घेतले. त्यावेळी त्या चौघी महिलाही सोबत होत्या. पण स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मोबाईल लोकेशन वरून नितीन पोपटघट यालाच ताब्यात घेतल्याने त्यावेळी अन्य आरोपी पसार झाले. त्यामुळे पोलिसाच्या हाती आलेले आयते सावज निष्क्रीयतेमुळे सुटले. शहरातील मसूरकर ज्वेलर्समध्ये साडे सात लाखाची चोरी करून चार महिला पसार झाल्या होत्या. या महिलांनी सावंतवाडीत चोरी केली. त्यापूर्वी कणकवलीतील एका दुकानाचीही पाहणी केली. पण त्यांना यश आले नाही. अखेर सावंतवाडीतील मसूरकर ज्वेलर्समध्ये वर ठेवलेली सोन्याची पुडी त्यांनी अलगद उचलून नेली. यात साडेसात लाख रूपयांचे दागिने होते. ज्यावेळी या महिलांनी दुकानात प्रवेश केला. त्यावेळी त्या महिला वेगळ्या रिक्षातून आल्या होत्या. तसेच जातानाही त्यांनी दोन रिक्षा बदलत शिरोड्या नाक्यावरून गाडी पकडली. त्यामुळे पोलिसांनाही तपास करताना थोडसे अडचणीचे गेले. तरिही स्थानिक पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी या तपासाचा छडा लावला. या महिला दोन पुरूषांसमवेत स्वीफ्ट कारने आल्या होत्या. त्यांनी कणकवलीत पहिल्यांदा जाऊन बेलवलकर यांच्या दुकानात चोरीचा प्रयत्न केला. त्यात यश आले नाही म्हणून त्या महिला सावंतवाडीत आल्या. यावेळी त्या महिलांचा सतत एका मोबाईल धारकाशी संपर्क सुरू होता. त्यावरूनच पोलिसांनी बीड देवराईमधून नितीन पोपटघट याला ताब्यात घेतले. मात्र, नितीन याला ताब्यात घेत असतानाच देवराईमधील घरी महिलेसह नितीन हा चर्चा करीत बसला होता. त्यावेळीच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. पण त्या महिलांची पोलिसांनी चौकशी केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या हाती आलेले सावज सुटले. पोलिसांच्या या निष्क्रीयतेची चर्चा आता सावंतवाडी शहरात सुरू आहे. याबाबत चोरी प्रकरणातील आरोपी नितीन याला विचारले असता, त्यानेही आपण चर्चा करीत बसल्याचे मान्य केले. मात्र, एका पोलीस अधिकार्‍याला विचारले असता याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, हे आरोपी पकडले असते तर सावंतवाडी शहरातील मसूरकर ज्वेलर्समधील चोरीप्रकरणाचा तपास संपला असता. तसेच सिंधुदुर्ग पोलिसांची मान ताठ राहिली असती. यातील कावेरी ही महिला बीडमधील तर अन्य महिला परभणी, गंगाखेड येथील असून या महिलांवर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पुढे येत आहे. या महिलांना पकडण्यासाठी सावंतवाडी पोलीस स्थानिक पोलिसांची मदत घेणार आहेत. तसेच आरोपीची मालमत्ता सील करण्यात यावी, यासाठी न्यायालयाकडे मागणी करणार आहेत. (प्रतिनिधी)