शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचा बेकायदेशीर लिलाव

By admin | Updated: January 3, 2015 00:14 IST

सासोली येथील घटना : जमीनमालकांचे तहसीलदारांना निवेदन

कसई दोडामार्ग : सासोली गावातील लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, हा दृष्टीकोन ठेवून काही वर्षांपूर्वी सासोली- हेदूसवाडी येथील काही ग्रामस्थांनी जमीन उपलब्ध करून दिली. कागद कारखान्यांसाठी ही जागा विधायक कामासाठी दिली असताना या जमिनीची खोटी कागदपत्रे बनवून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नसताना या जमिनींची जी बेकायदेशीररित्या लिलाव पद्धत करण्यात आली, त्या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन जमीन आमच्या ताब्यात मिळावी, अशी मागणी सासोली येथील जमीन मालकांनी गुरुवारी दोडामार्ग तहसीलदार संजय जाधव यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले. मौजे सासोली- हेदूसवाडी सर्वे नं. ४७/२३ ब +४५ ब, ४७/२५, ४७/२६, ४७/२५ अ, ४७/२४, ४७/२३ अ ही जमीन सिंधुदुर्ग येथील हाथकागद सहकारी औद्योगिक उत्पादक संस्थेला सासोली येथे कागद कारखाना होत असल्याने तसेच येथील लोकांना रोजगार मिळेल, या आशेने कारखान्यांसाठी ही जमीन दिली होती. सासोली-हेदूसवाडी येथील कारखान्याच्या लोकांच्या जमिनीचा झालेला गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर जमीन मालक नारायण कृष्णा शिरसाट, दत्ताराम धाऊसकर, दयानंद धाऊसकर, ज्ञानेश्वर धाऊसकर, गेविंद धाऊसकर, बाळा धाऊसकर, बापू सावंत, आनंद सावंत, संंतोष परब, संजय सावंत, प्रेमानंद धाऊसकर, विठ्ठल धाऊसकर, चंद्रकांत धाऊसकर, अमोल धाऊसकर, वासुदेव परब व अन्य जमीन मालकांनी अ‍ॅड. अनिल दळवी यांच्यासोबत गुरूवारी दोडामार्ग तहसीलदार संजय जाधव यांची भेट घेऊन या जमिनीची बेकायदा लिलाव पद्धत त्यांच्या निदर्शनास आणून दिली.तत्कालीन जिल्हाधिकारी विरेंद्र सिंग यांचे कोणतेही आदेश नसताना बोगस लिलाव पद्धत अवलंबून कोट्यवधी रुपयांची जमीन हडप करण्याचा घाट कारखान्याच्या संचालकांनी घातला असून याला आमचा तीव्र विरोध आहे. आमची जमीन आम्हाला परत मिळावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली. सासोली-हेदूसवाडी येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या जमिनीच्या सातबाराचे अवलोकन करता, आमच्या जमिनी मालकांकडून खरेदी केल्या आहेत. ही बाब पूर्णपणे चुकीची आहे. सासोली- हेदूसवाडी येथील आमच्या जमिनी मुलांना नोकऱ्या देऊन कागद कारखाना चालविला जाईल, या मूळ हेतूने आमच्या वारसदारांनी दिल्या होत्या. मात्र, मूळ हेतूला हरताळ फासून ही जमीन करोडो रुपयांना विकण्याचा घाट महसूल प्रशासनाकडून केला जात आहे. शिवाय जी नोटीस बजावण्यात आली आहे, त्याला आमचा तीव्र विरोध आहे. नोटीसमधील जंगम मालमत्ता या ठिकाणी उपलब्ध नसताना नोटीसही बेकायदेशीर आहे. या नियमबाह्य बाबींचा आम्ही निषेध करतो, असे नमूद करून सासोली कागद कारखाना शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रियेची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाव्यात, अशी मागणी सासोली ग्रामस्थांनी दोडामार्ग तहसीलदार संजय जाधव यांची भेट घेऊन केली आहे. (वार्ताहर)