माझ्यामुळे युती तुटली म्हणता मग व्हिडिओच पाठवतो; उदय सामंत, निलेश राणेंच्या टीकेला रविंद्र चव्हाणांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:20 IST2025-11-25T17:19:09+5:302025-11-25T17:20:36+5:30
Local Body Election: मी काही तरी बोललो तर..

माझ्यामुळे युती तुटली म्हणता मग व्हिडिओच पाठवतो; उदय सामंत, निलेश राणेंच्या टीकेला रविंद्र चव्हाणांचे प्रत्युत्तर
सावंतवाडी : माझ्यामुळे युती तुटली म्हणाऱ्यांनी पहिल्यांदा मी व्हिडिओ पाठवतो तो बघावा आणि नंतर बोलावे. मी काही तरी बोललो तर ते संपूर्ण महाराष्ट्रात लागू होईल म्हणून बोलत नाही. पण काहीतरी ट्विस्ट करण्याचा प्रयत्न काही जणांनी करू नये असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिला. उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे हे रविंद्र चव्हाण यांच्यामुळे युती तुटली असे सांगतात याबाबत चव्हाण यांना विचारले असता त्यांनी प्रत्युत्तर दिले.
चव्हाण म्हणाले, युती माझ्यामुळे तुटली म्हणतात पण यात काही तथ्य नाही. माझ्याकडे जो व्हिडिओ तो तुम्हाला पाठवतो मग तुम्ही ठरवा कुणामुळे युती तुटली. कारण मी काही भूमिका मांडली तर महाराष्ट्रात लागू होत असते म्हणून मी बोलणार नाही असे सांगत माझ्याकडे असलेला व्हिडिओच पाठवतो तुम्ही बघा असे सांगितले.
सावंतवाडीत आम्हाला आमच्या विचारांची माणसे हवीत यांची कारणे अशी आहेत की, केंद्रात व राज्यात भाजप विचारांची सत्ता आहे. यावेळी नगरसेवक पदाचे उमेदवार अॅड अनिल निरवडेकर याच्या कार्यालयाचा शुभारंभ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंत्री नितेश राणे, प्रभाकर सावंत, अतुल काळसेकर, विशाल परब, श्रध्दा सावंत भोंसले, लखम सावंत भोंसले, एकनाथ नाडकर्णी आदी उपस्थित होते.