शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

देश वाचवायचा असेल तर शिवशक्ती-भीमशक्तीची एकजूट आवश्यक, नितेश राणे यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 13:36 IST

'संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे आम्ही नक्की काढू'

कणकवली : छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा प्रत्येक मावळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपला बाप मानतो. संविधान बदलणार अशी आवई उठविणाऱ्यांना संविधान जागर यात्रा ही एक चपराक आहे. भारतात फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान चालणार आहे. त्यामुळे संविधान जागर यात्रेच्या निमित्ताने आंबेडकरी जनतेला विश्वासात घ्या. सध्याच्या स्थितीत आपला देश वाचवायचा असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्तीची एकजूट आवश्यक आहे. हे त्यांना पटवून द्या, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.

कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रविवारी संविधान जागर यात्रेनिमित्त आयोजित प्रबोधन सभेत आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी अनुसुचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. वाल्मीक निकाळजे, कोकण समन्वयक नितीन मोरे, यात्रा सभा अध्यक्ष विकास गवाळे, योजनाताई ठोकळे, स्नेहाताई भालेराव, अशोक गायकवाड, अंकुश जाधव, आकाश आंबोरे, संदेश जाधव, अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, आरपीआय जिल्हाध्यक्ष अजित कदम, गुणाजी जाधव, सिद्धार्थ जाधव आदीसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.नितेश राणे म्हणाले, कणकवलीत संविधान जागर यात्रेचे आगमन झाले आहे. त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचे विचार मांडणे हा योगायोग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मला संविधान लिहिताना जास्त कष्ट पडले नाहीत, कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते. त्यामुळे संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे आम्ही नक्की काढू.

संविधानाचे रक्षण करू अशी शपथ घेऊ. हेच या संविधान जागर यात्रेचे यश आहे. निवडणूक तोंडावर असताना कोणीतरी आपल्या गावात, वाडीत येऊन सभेत सांगेल की संविधान बदलणार आहेत. त्यामुळे तुमच्या मनात भीती घालेल. आजची संविधान जागर सभा या भूलथापेला चोख उत्तर आहे.

..म्हणून बांगलादेशमध्ये अराजकबांगलादेशमध्ये बाबासाहेबांचे संविधान नाही म्हणून आज तिथे अराजकता माजली आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संसदेत का लटकले? राहुल गांधी यांना संविधानात किती पाने आहेत? याचे उत्तर लोकसभेत देता आले नाही. अशा राहुल गांधींच्या उमेदवारांना आपण मते देणार आहोत काय? असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे