शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

... अन् रिटायर होताना 'ते' लालपरीसमोर नतमस्तक झाले, अक्षरशः रडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 20:47 IST

सेवानिवृत्त होताना लालपरीसमोर नतमस्तक होत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करणाऱ्या वाहक चंद्रशेखर जाधव यांच्या सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या त्या फोटोने सर्वांनाच भावूक केले

ठळक मुद्दे..अन् ते एसटीसमोर झाले चक्क नतमस्तक, कामाप्रतीची आत्मीयता ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर वेंगुर्ल्यातील वाहक चंद्रशेखर जाधव सेवानिवृत्त

वेंगुर्ला : महाराष्ट्र परिवहन महामंडळामध्ये गेली ३८ वर्षे लालपरीचे वाहक (कंडक्टर) म्हणून समर्थपणे सेवा केली. त्याच लालपरीसमोर सेवानिवृत्त होताना नतमस्तक होत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करणाऱ्या वाहक चंद्रशेखर जाधव यांच्या सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या त्या फोटोने सर्वांनाच भावूक केले. मूळच्या सोलापूर येथील असलेल्या चंद्रशेखर जाधव कुटुंबाचे गेली सत्तर वर्षे या परिवहन महामंडळाशी घट्ट नाते जडले होते. त्यांचे वडील भगवान जाधव हे एसटी चालक म्हणून १९६२ मध्ये परिवहन मंडळात सावंतवाडी येथील एसटी आगारात रुजू होत सेवा त्यांनी दिली होती. तर त्यांचा वारसा जपत १९८२ मध्ये चंद्रशेखर जाधव यांनी वाहक (कंडक्टर)म्हणून आपल्या सेवेस सावंतवाडी याच आगारामध्ये प्रारंभ केला.

त्यामुळे बऱ्याच वेळा वडील चालक व मुलगा वाहक म्हणून लालपरीची सेवा प्रवाशांना देताना आपणही एकत्र प्रवास केला. काहींच्याच असा दुर्मिळ योग वाट्याला येतो. त्यामुळे एसटीविषयी असलेली आत्मीयता वाढीस लागली. वडील आपल्या चाळीस वर्षांच्या सेवेनंतर १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र, चंद्रशेखर जाधव यांचे या लालपरीशी घट्ट नाते जडले.पुढे सेवेत बदली होऊन विविध आगारात काम करण्याची संधी मिळाली. तीच निष्ठा आणि कामाविषयी असलेली आत्मीयता वाढतच गेली. जीवनातील अर्धे आयुष्य लालपरी संगे घालवताना अनेकांशी संबंध येऊन मैत्रीचे तसेच आपुलकीचे नातेही याच लालपरीने तयार केले, असे ते सांगतात.कुटुंब परिवहनपासून दूर जाण्याची खंतघरातील दोघेजण गेली सत्तर वर्षे परिवहन मंडळाशी जोडलो गेल्याने आपल्या मनात एसटीविषयी आदर निर्माण झाला. मात्र, आपल्या पुढील पिढीने वेगळे क्षेत्र निवडल्याने आपले कुटुंब आता परिवहनपासून दूर जाणार असल्याची खंत जाधव यांना आहे.

अनेक लोकांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण त्यांचे सहप्रवाशी झालो याचा आनंद काही औरच असतो. आपल्या ३८ वर्षांच्या सेवेत नेहमीच प्रवास असताना साधा अपघात होण्याचा प्रकार कधीच घडला नाही.

गेली पंधरा वर्षे वेंगुर्ला आगारात एसटीची सेवा देत असतानाच ३१ जुलै रोजी सेवेतील शेवटची किरणपाणी आरोंदा-वेंगुर्ले फेरी पूर्ण करून आपल्या लाडक्या लालपरीला निरोप देताना जाधव तिच्यासमोर श्रीफळ वाढवून नतमस्तक झाले. आपल्या डोळ्यातील अश्रूंनी त्यांनी लालपरीचा निरोप घेतला. 

टॅग्स :state transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग