शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

'मला बोलता येतं पण मी उद्या बोलेन', राज ठाकरेंचा विरोधकांना सुचक इशारा

By अनंत खं.जाधव | Published: November 30, 2022 8:12 PM

राज ठाकरे कोल्हापूरचा दौरा आटपून सायंकाळी उशिरा सावंतवाडीत दाखल झाले.

सावंतवाडी: 'मला बोलता येतं पण मी उद्या बोलेन', असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सिंधुदुर्गात एन्ट्री करताच विरोधकांना सुचक इशारा दिला आहे. ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापूरचा दौरा आटपून सायंकाळी उशिरा आंबोली मार्गे सावंतवाडीत दाखल झालेल्या राज यांचे मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शिवाजी चौकात जोरदार स्वागत केले. यावेळी मनसे विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे, मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, मनसे नेत्या अनिता माजगावकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, शहर प्रमुख आशिष सुभेदार, अनिल केसरकर, दया मेस्त्री यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.

राज ठाकरे यांचे सावंतवाडी मध्ये आगमन होताच मनसे कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये त्यांची एक छबी टिपण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी ठाकरे यांनी काही क्षण गाडीतून उतरून कार्यकर्त्यांना व नागरिकांना अभिवादन केले, त्यानंतर ते शिवाजी चौकातून थेट बाजारपेठ मार्गे मनसे कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. यावेळी त्यांना मोती तलावाचे सौंदर्य ही चांगलेच भावले. 

कार्यालयात प्रवेश करताच उपस्थित कार्यकर्त्यांना रामेश्वर प्लाझा या मुख्य बाजारपेठेतील इमारतीमध्ये जागेचे दर काय, आपल्याला तिथे कार्यालय करायचे आहे, असे सांगत उपस्थितांना सुखद धक्का दिला.जागेचा दर विचारा असेही सांगितले आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. उपस्थित पत्रकारांनी ठाकरे यांना बोलणार का?असे विचारताच मला बोलता येते, पण आज नाही उद्या सविस्तर बोलेन, असे म्हणत त्यांनी सूचक इशारा दिला. सध्या ठाकरे यांच्या निशाण्यावर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील काही नेते तसेच राज्यपाल आहेत. त्यामुळे उद्या काय बोलतील याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेsindhudurgसिंधुदुर्गMNSमनसे