Sindhudurg ZP Election 2026: सत्तेच्या चाव्या कुणाकडे? कुणाचे नशीब उजळणार?; १० हायव्होल्टेज लढतींकडे जिल्ह्याचे लक्ष

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 5, 2026 19:29 IST2026-02-05T19:28:54+5:302026-02-05T19:29:16+5:30

बंडखोरी आणि प्रत्यक्ष उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला!

High Voltage to contest 10 seats in Sindhudurg Zilla Parishad elections | Sindhudurg ZP Election 2026: सत्तेच्या चाव्या कुणाकडे? कुणाचे नशीब उजळणार?; १० हायव्होल्टेज लढतींकडे जिल्ह्याचे लक्ष

Sindhudurg ZP Election 2026: सत्तेच्या चाव्या कुणाकडे? कुणाचे नशीब उजळणार?; १० हायव्होल्टेज लढतींकडे जिल्ह्याचे लक्ष

महेश सरनाईक

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सत्तेचे समीकरण ठरवण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. जिल्ह्यातील ५० पैकी ८ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित ४२ जागांसाठी येत्या ७ फेब्रुवारीला मतदान होत आहे. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरत असून, प्रामुख्याने महायुतीमधील बंडखोरी आणि उद्धवसेनेने दिलेले कडवे आव्हान यामुळे अनेक मतदारसंघांत थेट संघर्ष पाहायला मिळत आहे.

प्रत्यक्ष निवडणुकीच्या अगोदर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा परिषदेच्या ८ आणि पंचायत समितीच्या १७ जागा बिनविरोध होत महायुतीने कब्जा मिळवला होता. सिंधुदुर्गच्या या बिनविरोध पॅटर्नची चर्चा संपूर्ण राज्यभरात पसरली होती. राज्यात १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत असताना केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच एवढ्या प्रमाणावर सदस्य बिनविरोध निवडून आले होते. आता जिल्हा परिषदेच्या ४२ जागांसाठी शनिवारी मतदार होणार आहे.

जिल्ह्यातील १० प्रमुख 'हायव्होल्टेज' लढती

जिल्हा परिषद मतदारसंघ प्रमुख लढत (उमेदवारांची नावे) राजकीय पेच

१. कोलगाव (सावंतवाडी) महेश सारंग (भाजप) vs मायकल डिसोजा (अपक्ष) ( सावंतवाडीतील ही सर्वात प्रतिष्ठेची लढत असून येथे दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.)
२. माटणे (दोडामार्ग) दीपक गवस (भाजप) vs बाबुराव धुरी (उद्धवसेना) , राजेंद्र म्हापसेकर (अपक्ष) (येथील स्थानिक समीकरणांमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारासमोर मोठे आव्हान आहे.)
३. कलमठ (कणकवली) सुप्रिया संदीप मेस्त्री (भाजप) vs वैदेही गुडेकर (उद्धवसेना) (राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धवसेनेने तगडे आव्हान उभे केल्याने ही लढत रंजक होणार आहे.)
४. माणगाव (कुडाळ) रमाकांत ताम्हाणेकर (उद्धवसेना) vs रूपेश कानडे (भाजप) (कुडाळ तालुक्यात वर्चस्व टिकवण्यासाठी ही जागा दोन्ही बाजूने महत्त्वाची मानली जात आहे.)
५. तळवडे (सावंतवाडी) रूपेश राऊळ(उद्धवसेना) vs संदीप गावडे (भाजप) (केसरकर आणि राणे समर्थकांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे.)
६. आचरा (मालवण) वर्षा सांबारी (शिंदेसेना) vs संजना रेडकर (उद्धवसेना) (पर्यटन पट्ट्यातील या जागेवर बंडखोर उमेदवाराचा प्रभाव निर्णायक ठरू शकतो.)
७. नेरुर (कुडाळ) संजय पडते (शिंदेसेना) vs रूपेश पावसकर (गाव विकास आघाडी) (कुडाळ तालुक्यातील राजकीय वर्चस्वासाठी ही जागा महत्त्वाची आहे.)
८. तुळस (वेंगुर्ला) योगिता परब (शिंदेसेना) vs पल्लवी आरमारकर, (उद्धवसेना) सुजाता पडवळ (अपक्ष) (वेंगुर्ल्यातील राजकीय समीकरणे या जागेवर अवलंबून आहेत.)
९. फोंडाघाट (कणकवली) मामा हळदिवे (शिंदेसेना) vs अनंत पिळणकर (राष्ट्रवादी शरद पवार) , राजन चिके(अपक्ष) (अंतर्गत नाराजीचा फटका कोणाला बसणार, याची येथे उत्सुकता आहे.)
१० पेंडूर (मालवण) संतोष साटविलकर (शिंदेसेना) vs घनश्याम उर्फ बाळू राणे (उद्धवसेना) (या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

निवडणुकीचे गणित

  • एकूण जागा: ५०
  • बिनविरोध जागा: ०८ (भाजप ७, शिंदेसेना १)
  • मतदान होणाऱ्या जागा: ४२
  • बहुमतासाठी आवश्यक आकडा: २६
  • महायुतीला विजयासाठी हवेत: १८ (८ आधीच विजयी)


बंडखोरीचा अदृश्य प्रभाव

जिल्ह्यात १० हून अधिक जागांवर महायुतीतील उमेदवारांविरुद्ध स्वकीयांनीच बंड पुकारले आहे. हे बंडखोर उमेदवार कोणाचे गणित बिघडवणार, यावर निकालाची मदार आहे.

राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष

नेहमीप्रमाणे संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण नारायण राणे आणि उद्धव ठाकरे या दोन ध्रुवांभोवती फिरत आहे. ही निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे.

चाकरमान्यांची भूमिका

निवडणूक ७ फेब्रुवारीला असल्याने मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्यांचा कौल नेहमीच निर्णायक ठरतो.

प्रशासकीय यंत्रणा सज्ज

७ फेब्रुवारीला मतदानासाठी ८ हजार कर्मचारी आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

'सुपर मंडे'चा फैसला

९ फेब्रुवारीला होणाऱ्या मतमोजणीत जिल्ह्यातील सत्तेचे केंद्र कुडाळ की कणकवली राहणार, हे स्पष्ट होईल.

Web Title : सिंधुदुर्ग ZP चुनाव 2026: किसकी होगी जीत? मुख्य लड़ाईयां आगे

Web Summary : सिंधुदुर्ग ZP चुनाव में 8 निर्विरोध जीते, 42 सीटों पर मुकाबला। कोलगांव, माटणे, कलमथ में अहम लड़ाई। बागी प्रभाव और राणे बनाम ठाकरे प्रतिद्वंद्विता महत्वपूर्ण।

Web Title : Sindhudurg ZP Election 2026: Who Will Win? Key Battles Ahead

Web Summary : Sindhudurg ZP elections see 8 unopposed wins, 42 seats contested. Key battles include Kolgaon, Matane, Kalamth. Rebel impact and Rane vs. Thackeray rivalry crucial.